Nathan Lyon Record In Test: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघामध्ये अॅशेस मालिकेचा थरार सुरु आहे. मालिकेतील पहिल्या सामन्यात ऑस्ट्रलियाने दमदार कामगिरी करून विजय मिळवला होता. तर दुसरा सामना ऐतिहासिक लॉर्ड्स मैदानावर सुरु आहे.
या सामन्यात इंग्लंडने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. हा सामना जिंकून इंग्लंडचा संघ मालिका बरोबरीत आणण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
दरम्यान या सामन्यासाठी मैदानात उतरताच नॅथन लायनच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद आहे.
सलग १०० सामने खेळणारा पहिलाच गोलंदाज..
इंग्लंड संघाविरुद्ध सुरु असलेला अॅशेस मालिकेतील दुसरा कसोटी सामना नॅथन लायनसाठी अतिशय महत्वाचा सामना असणार आहे. त्याचा हा सलग १०० वा कसोटी सामना आहे. तो सलग १०० कसोटी सामने खेळणारा एकमेव गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी असा कारनामा कुठल्याच गोलंदाजाला करता आला नाही. या ऐतिहासिक सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे.
सलग १०० सामने खेळणारा ६ वा खेळाडू..
नॅथन लायन हा कसोटी क्रिकेटमध्ये सलग १०० सामने खेळणारा पहिला गोलंदाज तर ६ वा खेळाडू ठरला आहे. कुठल्याही खेळाडूसाठी विश्रांती न घेता सलग १०० सामने खेळणं सोपं मुळीच नसतं. यापूर्वी इंग्लंडचा माजी फलंदाज अॅलिस्टर कुकने सलग १५९ कसोटी सामने खेळण्याचा पराक्रम केला होता.
त्यानंतर अॅलेन बॉर्डरने सलग १५३, मार्क वॉने सलग १०७ आणि सुनील गावसकरने सलग १०६ कसोटी सामने खेळले आहेत. ब्रॅंडन मॅक्क्युलमने १०१ आणि आता नॅथन लायनचा या यादीत समावेश झाला आहे. (Latest sports updates)
कसोटी क्रिकेटमध्ये सलग सर्वाधिक सामने खेळणारे खेळाडू..
अॅलिस्टर कुक -१५९
अॅलेन बॉर्डर- १५३ सामने,
मार्क वॉ १०७ सामने
सुनील गावसकर - १०६ सामने
ब्रॅंडन मॅक्क्युलम १०१ सामने
नॅथन लायन- १०० सामने
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.