team india instagram
Sports

MS Dhoni: बर्थडे गिफ्टसाठी थँक्स, माझ्या हृदयाचे ठोके..', वर्ल्डकप विजयानंतर कॅप्टन कूलची भावुक पोस्ट- PHOTO

MS Dhoni Instagram Post: भारतीय संघाने टी -२० वर्ल्डकप जिंकल्यानंतर एमएस धोनीने कौतुक करणारी पोस्ट शेअर केली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघाने तब्बल १३ वर्षांच्या प्रतीक्षेला पूर्णविराम देत अखेर आयसीसी ट्रॉफी जिंकली आहे. यापूर्वी २०१३ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीवर नाव कोरलं होतं. त्यानंतर भारतीय संघाने आयसीसीच्या फायनलमध्ये प्रवेश तर केला, मात्र फायनल जिंकता आली नव्हती. यावेळी रोहितच्या नेतृत्वात भारतीय संघाने टी -२०वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली आहे. दरम्यान सोशल मीडियावर ॲक्टीव्ह न राहणाऱ्या एमएस धोनीने भारतीय संघाचा फोटो शेअर करत आभार मानले आहेत.

एमएस धोनी हा सोशल मीडियावर खूप कमी ॲक्टीव्ह असतो. त्याने ७ जुलै २०२३ रोजी इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट शेअर केली होती. त्यानंतर त्याने आता भारतीय संघाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या बॅकग्राउंडला त्याने चक दे इंडिया गाणं लावलं आहे.

भारतीय संघाला ३ वेळेस आयसीसी चॅम्पियन बनवणाऱ्या धोनीने आपल्या कॅप्शनमध्ये लिहिले की, ' भारतीय संघ वर्ल्ड चॅम्पियन! हा फायनलचा सामना पाहताना माझ्या हृदयाचे ठोके वाढले होते. दडपण असताना शांत राहून स्वतःच्या कौशल्यांवर विश्वास ठेवून भारतीय संघाने विजय खेचून आणला. याकरिता तुम्हा सर्वांचे मनापासून अभिनंदन. वर्ल्डकपची ट्रॉफी पुन्हा भारतात आणल्याबद्दल भारतीय फॅन्सच्या वतीने धन्यवाद आणि शुभेच्छा. माझ्या वाढदिवसानिमित्त अमूल्य गिफ्ट दिल्यामुळे तुम्हा सर्वांचे आभार.'

भारतीय संघाने २००७ मध्ये एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यादांच वर्ल्डकप जिंकला होता. त्यावेळीही रोहित शर्माने महत्त्वाची भूमिका बजावली होती. आतापर्यंत जितके टी -२० वर्ल्डकप झाले आहेत. त्यामध्ये रोहित शर्माने भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलं आहे. मात्र यावेळी रोहित शर्मा कर्णधार म्हणून मैदानात उतरला आणि भारतीय संघाला टी -२० वर्ल्डकप जिंकून दिला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: पुण्यात शिवसेना उबाठा महिला आघाडीचे आंदोलन, माझं कुंकू , माझा देश आंदोलन

Vasai Fort History: प्राचीन व्यापार केंद्र म्हणून ओळखला जाणारा वसई किल्ला, जाणून घ्या त्याचा इतिहास आणि वैशिष्ट्ये

Colorful Snakes : भारतातले रंगीबेरंगी आणि विषारी साप कोणते?

Disha Patani: घराबाहेर गोळीबार झाल्यानंतर दिशा पटानीचा पहिला पब्लिक अपीयरन्स; पाहा व्हायरल VIDEO

Pimpri Chinchwad Police : फिल्मी स्टाईलने १५ किमी पाठलाग; सराईत चोरटा ताब्यात, साडेसहा लाखांचा ऐवज हस्तगत

SCROLL FOR NEXT