Mumbai Indians: टी -२० क्रिकेटचा क्रेझ गेल्या काही वर्षांमध्ये गगनाला जाऊन भिडला आहे. आयपीएल स्पर्धेला भरभरून प्रतिसाद मिळाल्यानंतर आता जगभरात टी -२० लीग स्पर्धांचे आयोजन केले जाऊ लागले आहे.
फ्रँचायजी संघाची निवड करून जेतेपदासाठी आपला संघ मैदानात उतरवते. स्पर्धेसाठी संघाची निवड करण्याइतपत ठिक होत. मात्र आता मुंबई इंडिसन्स संघ चक्क आतंरराष्ट्रीय खेळाडु खरेदी करण्याच्या तयारीत आहे.
डेलीमेलच्या रिपोर्टनुसार, मुंबई इंडिसन्स संघ इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसोबत एक करार करण्याच्या तयारीत आहे. ज्याचा परीणाम इंग्लंड क्रिकेट बोर्डवर होण्याची शक्यता आहे. काही दिवसांपुर्वी असा दावा करण्यात आला होता की, काही फ्रँचायजी इंग्लंडच्या ५-६ खेळाडूंसोबत वार्षिक करार करण्याच्या तयारीत आहे.
या खेळाडूंना २ फ्रँचायजींमध्ये विभागलं जाईल. तसेच या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळण्यासाठी फ्रँचायजीची पराभवानी घ्यावी लागणार आहे.
आता याबाबत एक मोठी माहिती समोर आली आहे की, मुंबई इंडियन्स फ्रँचायजी इंग्लंडचा वेगवान गोलंदाज जोफ्रा आर्चरसोबत वार्षिक करार करण्याच्या तयारीत आहे. या करारानुसार मुंबई इंडियन्स त्याला कोट्यवधी रुपये देणारा असल्याची माहिती समोर येत आहे.
तो वर्षभर मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत जगभरातील टी -२० लीग स्पर्धांमध्ये खेळताना दिसून येऊ शकतो. यादरम्यान त्याला आपल्या देशासाठी खेळण्यासाठी मुंबई इंडियन्सची अनुमती घ्यावी लागणार आहे. (Latest sports updates)
क्रिकेटमध्ये फुटबॉल पॅटर्नचा शिरकाव..
असे घडल्यास ही पहिलीच वेळ असेल जेव्हा एक क्रिकेटपटू आपला राष्ट्रीय संघ सोडून फ्रँचायजीसोबत करार करेल. फुटबॉलमध्ये हा पॅटर्न फॉलो केला जातो. खेळाडू एका क्लबसोबत करार करतात.
ते केवळ मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्या देशाचे प्रतिनिधित्व करतात. इतर वेळी ते करारबद्ध असलेल्या क्लबसाठी खेळत असतात. असे म्हटले जात आहे की, मुंबई इंडियन्स जोफ्रा आर्चरसोबत १० कोटींचा करार करू शकतो.
जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर..
जोफ्रा आर्चर आयपीएल २०२३ स्पर्धेतून बाहेर झाला आहे. दुखापतीने त्रस्त असलेला जोफ्रा आर्चर मायदेशी परतला आहे. या हंगामात देखील त्याला जास्त सामने खेळण्याची संधी मिळाली नाहीये.
मुंबई इंडियन्सने त्याला आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात ८ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. गेल्या हंगामात तो दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. तर या हंगामात देखील तो दुखापतीमुळे बाहेर झाला आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.