mumbai indians holi rohit sharma and hardik pandya played holi together video went viral amd2000 instagram
Sports

Mumbai Indians Holi: मुंबईकरांची होळी! रोहित-हार्दिकने एकत्र लुटला होळीचा आनंद..पाहा Video

Rohit Sharma-Hardik Pandya Holi Celebration: आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली

Ankush Dhavre

Rohit Sharma-Hardik Pandya Holi Celebration Video:

आयपीएल २०२४ स्पर्धा सुरु होण्यापूर्वीच मुंबई इंडियन्सने हार्दिक पंड्याला आपल्या संघात स्थान दिलं. त्यानंतर रोहितला कर्णधारपदावरुन काढून ही जबाबदारी हार्दिक पंड्यावर सोपवली. तेव्हापासूनत दोघांमधील संबंध ठिक नसल्याच्या चर्चा सुरु झाल्या आहेत. मुंबई इंडियन्स आणि गुजरात टायटन्स यांच्यातील सामन्यातील काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले. दरम्यान आता हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा एकत्र होळी खेळताना दिसून आले आहेत. ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा आणि हार्दिक पंड्याची होळी...

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. ज्यात मुंबई इंडियन्स संघातील खेळाडू होळी खेळताना दिसून येत आहेत. या व्हिडिओमधघ्ये लसिथ मलिंगा पिचकारी खेळताना दिसून येत आहे. तर हार्दिक पंड्या गँगस्टरच्या लूकमध्ये असल्याचं दिसून येत आहे. मुख्य बाब म्हणजे हार्दिक पंड्या आणि रोहित शर्मा एकत्र होळी खेळताना दिसून येत आहेत. यासह पीयुष चावला, तिलक वर्मा आणि डेवाल्ड ब्रेविसदेखील रंग उधळताना दिसून आले आहेत.

मुंबई इंडियन्सच्या अधिकृत सोशल मीडियावर आणखी काही फोटो देखील शेअर करण्यात आले आहेत. ज्यात मुंबईचे खेळाडू एकमेकांना रंग लावून पोज देताना दिसून येत आहेत. या होळीमुळे संघातील खेळाडूंचा दुरावा दुर होऊन खेळाडू पुढील सामन्यात एकजूट होऊन खेळतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. (IPL news in marathi)

पहिल्याच सामन्यात मुंबईचा पराभव...

आयपीएल २०२४ स्पर्धेत मुंबईचा पहिला सामना गुजरात टायटन्स संघाविरुद्ध पार पडला. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना गुजरात टायटन्सने १६८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या मुबंई इंडियन्स संघातील फलंदाजांनी सुरुवातीच्या १० षटकांमध्ये शानदार फलंदाजी केली. मात्र शेवटच्या ५ षटकांमध्ये गुजरातच्या गोलंदाजांनी दमदार गोलंदाजी करत संघाला विजय मिळवून दिला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Sunday : कर्कच्या कामाचे कौतुक! धनु राशीच्या इच्छा पूर्ण होणार! पाहा, तुमचे राशिभविष्य

Anant Chaturdashi 2025 live updates : नागपुरातील दक्षिणामूर्ती गणेश मंडळाचा गणपती बडकस चौकात पोहचणार

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

SCROLL FOR NEXT