mumbai indians captain hardik pandya statement after win over sunrisers hyderabad in mi vs srh match amd2000 twitter
क्रीडा

Hardik Pandya Statement: 'मी स्वत:ला भाग्यवान समजतो..' मुंबईच्या विजयानंतर काय म्हणाला हार्दिक पंड्या?

Ankush Dhavre

अखेर हैदराबादविरुद्ध खेळताना मुंबईने आपला गड राखला. हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाला विजयासाठी १७४ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून तिलक वर्मा आणि सूर्यकुमार यादवने १४३ धावांची भागीदारी केली आणि मुंबईला एकतर्फी विजय मिळवून दिला.

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्स संघाकडून कुठल्याही विकेटसाठी केली गेलेली तिसरी सर्वात मोठी भागीदारी आहे. २०१३ नंतर पहिल्यांदाच मुंबईच्या फलंदाजांनी इतकी मोठी भागीदारी केली आहे. दरम्यान या विजयानंतर हार्दिक पंड्याच्या चेहऱ्यावर हसू फुललं आहे.

पियूष चावलाचं केलं कौतुक..

या सामन्यानंतर कर्णधार हार्दिक पंड्याने शानदार गोलंदाजी करणाऱ्या पियूष चावलाचं कौतुक केलं आहे. तो म्हणाला की,' मला नाही माहीत की इथून पुढे आमच्यासाठी समीकरण कसं असेल. मात्र आम्ही ज्याप्रकारे खेळ केला आहे, त्याचा आम्हाला नक्कीच आनंद आहे. आम्ही १५-२० धावा खर्च केल्या. मात्र आम्ही फलंदाजी करताना शानदार कामगिरी केली. मी आधी खेळपट्टी पाहतो आणि त्यानूसार गोलंदाजी करतो. पियूषने ज्या फलंदाजांना बाद केलं ते, आमच्याकडून सामना हिसकावून घेऊ शकत होते.'

तसेच तो पुढे म्हणाला की, ' टी-२० क्रिकेटमध्ये बदल करण्यापेक्षा सातत्य टीकवून ठेवणं अधिक महत्वाचं आहे. जे पियुषने आज करुन दाखवलं आणि त्यात तो यशस्वी ठरला. सूर्यकुमार यादव खरंच शानदार होता. मी भाग्यवान आहे की, सूर्यकुमार यादवसारखा फलंदाज माझ्या संघात आहे. मी आशा करतो की, अशा अनेक इनिंग त्याच्याकडून पाहायला मिळतील.'

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर मुंबई इंडियन्स संघाचा कर्णधार हार्दिक पंड्याने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना सनरायझर्स हैदराबाद संघाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ४८ धावांची खेळी केली.

या खेळीच्या बळावर हैदराबादने २० षटकअखेर १७३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्स संघाकडून सूर्यकुमार यादवने नाबात १०२ धावा आणि तिलक वर्माने नाबाद ३७ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून दिला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Governemnt Job: अन्न आणि औषध प्रशासनात नोकरीची सुवर्णसंधी; महिना १,१२,००० रुपये पगार; जाणून घ्या सविस्तर

Maharashtra Politics: उद्धव ठाकरेंचा डबल धमाका, महायुतीला 'दे धक्का',भाजप- राष्ट्रवादीचे २ बडे नेते शिवबंधन बांधणार; आज मातोश्रीवर पक्षप्रवेश

Viral Video: ना रोमान्स, ना कपल डान्स; दिल्ली मेट्रोत आता कुटाकुटी, viral video

Maharashtra Politics : गुहाटीवरून परतलेल्या ठाकरेंच्या शिल्लेदाराच्या मतदारसंघात काय घडतंय? वंचित'चं ठरलं, महायुतीत रस्सीखेच सुरूच

Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजनेचा पुढचा हप्ता कधी मिळणार? समोर आली मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT