Glowing skin tips: व्हाईटहेड्स परत कधीच येणार नाहीत; या ६ सिक्रेट स्किन केअरचा करा वापर

Surabhi Jayashree Jagdish

व्हाईट हेड्स

अनेक मुलींना व्हाईट हेड्सचा त्रास असतो. यामुळे चेहऱ्याची त्वचा कोरडी पडू लागते. त्यामुळे व्हाईटहेड्सचा त्रास कमी करण्यासाठी कोणते उपाय करू शकतो ते पाहूयात.

चेहरा दिवसातून दोनदा धुवा

चेहरा वॉश केल्याने साचलेलं अतिरिक्त तेल आणि धूळ-माती निघून जाते. पोर्स स्वच्छ राहतात आणि बंद होत नाहीत. त्यामुळे व्हाइटहेड्स तयार होण्याची शक्यता कमी होते.

आठवड्यात किमान दोनदा स्क्रब करा

हलक्या स्क्रबमुळे डेड स्किन निघून जाते. चेहऱ्यावरील पोर्स उघडतात आणि त्वचा तजेलदार दिसते. यामुळे व्हाइटहेड्स येत नाही.

त्वचा हायड्रेटेड ठेवा

कोरडी त्वचा जास्त प्रमाणात ऑयली होते. त्यामुळे 'नॉन-कॉमेडोजेनिक' म्हणजेच ऑइल-फ्री मॉइश्चरायझर वापरा. हे मॉइश्चरायझर पोर्स ब्लॉक करत नाही.

मेकअप काढून झोपा

रात्री मेकअप न काढता झोपल्यास पोर्स बंद होतात. त्यामुळे त्वचेवर घाण साचते आणि व्हाइटहेड्स वाढतात. झोपण्यापूर्वी क्लिन्झिंग मिल्क किंवा फेसवॉशने चेहरा स्वच्छ करा.

तळलेले आणि गोड पदार्थ टाळा

अशा पदार्थांमुळे त्वचा अधिक प्रमाणात ऑयली होते. त्यामुळे पोर्स ब्लॉक होतात आणि व्हाइटहेड्स तयार होतात. अशावेळी आहारात संतुलन ठेवणं आवश्यक आहे.

आहारात फळांचा समावेश करा

नैसर्गिक आहारामुळे त्वचा चांगली राहते. शरीराला आवश्यक पोषण मिळतं आणि टॉक्सिन्स बाहेर पडतात. यामुळे त्वचा तजेलदार दिसते.

कोणत्या भाज्यांमध्ये शेंगदाण्याचं कूट वापरू नये?

peanut powder acidity
येथे क्लिक करा