मुंबई इंडियन्स महिला संघाला नवा कोच मिळाला.
ऑस्ट्रेलियन माजी क्रिकेटपटू लिसा नाइटली यांची मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती.
चार्लोट एडवर्ड्स यांची जागा लिसा नाइटली यांनी घेतली.
महिला प्रीमियर लीगमधील मुंबई इंडियन्स फ्रँचायझीने त्यांच्या नवीन प्रशिक्षकाची घोषणा केलीय. ऑस्ट्रेलियन लिसा नाइटली यांची कोच म्हणून निवड करण्यात आलीय. चार्लोट एडवर्ड्स ह्या आधी मुंबई संघाच्या प्रशिक्षक होत्या. लिसाने ऑस्ट्रेलियन महिला संघाला दोन एकदिवसीय विश्वचषक विजेतेपदे (१९९७ आणि २००५) मिळवून दिली आहेत. ती महिला क्रिकेटमधील सर्वात आदरणीय प्रशिक्षकांपैकी एक आहे.
त्या भरपूर अनुभवी आहे जे मुंबई संघासाठी उपयुक्त ठरेल. प्रशिक्षकपदी नियुक्ती झाल्यानंतर लिसा नाइटलीने म्हणाले, WPL मध्ये नवीन मानके प्रस्थापित करणाऱ्या मुंबई इंडियन्स संघासोबत जुडणं हे सन्मानजनक आहे. यशावर भर देण्यात येईल, मैदानावर आणि मैदानाबाहेर प्रेरणा देताना या प्रतिभावान टीमसोबत काम करताना मला खूप आनंद होतोय.
लिसा नाइटली ही इंग्लंडची मुख्य प्रशिक्षक बनणारी पहिली महिला होती. तिला WBBL, The Hundred आणि WPL फ्रँचायझींना प्रशिक्षण देण्याचा व्यापक अनुभव आहे. गेल्या महिन्यात The Hundred मध्ये तिने नॉर्दर्न सुपरचार्जर्स महिला संघाचे जेतेपद मिळवून दिले. तिने ऑस्ट्रेलियन महिला संघासाठी ९ कसोटी, ८२ एकदिवसीय आणि एक टी-२० सामना खेळलाय.
WPL च्या मालकीण नीता अंबानी म्हणाल्या, "मुंबई इंडियन्स कुटुंबात लिसा नाईटलीचे स्वागत करताना आम्हाला आनंद होतोय. लिसाने महिला क्रिकेटबद्दलच्या तिच्या आवडीने पिढ्यांना प्रेरणा दिली आहे. तिच्या आगमनाने मुंबई इंडियन्ससाठी एका रोमांचक नवीन अध्यायाची सुरुवात झाली आहे."
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.