sarfaraz Khan  twitter
क्रीडा

Sarfaraz Khan Debut: 'पापा कहते है बडा नाम करेगा..' सरफराज खानचं पदार्पण होताच मुंबई इंडियन्सची खास पोस्ट व्हायरल

Ankush Dhavre

Mumbai Indians Post For Sarfaraz Khan:

मुंबईकर सरफराज खानला अखेर भारतीय संघाची जर्सी घालून मैदानात उतरण्याची संधी मिळाली आहे. भारत आणि इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसरा कसोटी सामना राजकोटच्या मैदानावर सुरु आहे.

या सामन्यासाठी सरफराज खानची प्लेइंग ११ मध्ये निवड करण्यात आली आहे. माजी भारतीय क्रिकेटपटू अनिल कुंबळेंच्या हस्ते त्याला ही कॅप देण्यात आली आहे. ही कॅप मिळताच सरफराज खानच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू आले. दरम्यान मुंबई इंडियन्सने देखील सरफराज खानसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.

मुंबई इंडियन्सने आपल्या सोशल मीडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टमध्ये त्यांनी सरफराज खानच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये तो आपल्या वडिलांना मिठी मारताना दिसतोय.

तर दुसऱ्या एका फोटोमध्ये तो आपल्या पत्नी आणि वडिलांसह उभा असल्याचं दिसून येत आहे. या फोटोला त्यांनी हटके कॅप्शन देखील दिलं आहे. त्यांनी कॅप्शन देत, 'पापा कहते हे बडा नाम करेगा,सरफराजचं कुटुंब हे कधीच विसरणार नाही..' असं लिहिलं आहे. (Cricket news in marathi)

तर पंजाब किंग्ज संघाच्या अधिकृत अकाऊंटवरुनही ध्रुव जुरेल आणि सरफराज खानसाठी खास पोस्ट शेअर करण्यात आली आहे. पंजाब किंग्सने देखील त्याच्या कुटुंबाचा फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये त्यांनी ध्रुव जुरेलचा फोटो देखील अॅड करण्यात आला आहे. या फोटोला त्यांनी ' स्वप्न सत्यात उतरलं..' असं लिहीलं आहे.

असा राहिलाय रेकॉर्ड...

प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये सरफराज खानचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. त्याने या फॉरमॅटमध्ये ४५ सामन्यांमध्ये ३९१२ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने १४ शतक आणि ११ अर्धशतक झळकावली आहेत. तचर लिस्ट ए क्रिकेटमधील कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ३७ सामन्यांमध्ये त्याने ६२९ धावा केल्या आहेत.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Dustbin Scam : नवी मुंबई मनपामध्ये डस्टबिन घोटाळा; काम न करता जुने फोटो दाखवून लाखोंचा भ्रष्टाचार

Karmayogi Abasaheb: सोलापुरात ५४ वर्षे आमदार, लोकांसाठी झटला, सर्वसामान्य नेत्याची कथा मोठ्या पडद्यावर! चित्रपटाचा ट्रेलर लाँच

Priyanka Chopra Daily Skin Care: वयाच्या ४२ व्या वर्षीही कशी राहिल त्वचा चमकदार? जाणून घ्या प्रियांका चोप्राच्या ब्युटीचं सिक्रेट

Maharashtra Politics: राजन तेलींनी भाजप का सोडली? नारायण राणेंचे नाव घेत केला थेट आरोप

Maharashtra News Live Updates: महाविकास आघाडीच जागा वाटप उद्या पूर्ण होणार

SCROLL FOR NEXT