Suryakumar Yadav  x
Sports

Suryakumar Yadav : आयपीएल सुरु असताना मुंबईला धक्का? सूर्यकुमार यादव साथ सोडणार?

Suryakumar Yadav News : यशस्वी जैस्वालने मुंबई सोडून गोव्याकडून रणजी स्पर्धेत खेळण्याचा निर्णय घेतला आहे. जैस्वालप्रमाणे सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबई सोडणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. या सर्व प्रकरणावर एमसीएने स्पष्टीकरण दिले आहे.

Yash Shirke

यशस्वी जैस्वालने मुंबईचा रणजी संघ सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने मुंबई क्रिकेट असोसिएशनला पत्र लिहून परवानगी मागितली आहे. मुंबईऐवजी गोव्याच्या रणजी संघाकडून खेळण्याचा यशस्वी जैस्वालचा निर्धार आहे. याच दरम्यान सूर्यकुमार यादव देखील मुंबईसोडून गोव्याकडून खेळायची तयारी करत असल्याच्या चर्चा सुरु झाल्या होत्या.

सूर्यकुमार यादव देखील जैस्वालप्रमाणे मुंबईच्या संघाकडून रणजीसह अन्य देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये खेळतो. तो मुंबईचा संघ सोडून गोव्याच्या संघात जाणार असल्याच्या चर्चांवर रंगलेल्या असताना या प्रकरणावर मुंबई क्रिकेट असोसिएशनने भाष्य केले आहे. एमसीएचे सचिव अभय हडप यांनी सुरु असलेल्या चर्चा अफवा असल्याचे म्हटले आहे. सूर्या मुंबईकडून खेळण्यासाठी वचनबद्ध असल्याचेही हडप यांनी स्पष्ट केले आहे.

'सूर्यकुमार यादव मुंबईकडून खेळण्याऐवजी गोव्याकडून खेळणार असल्याच्या सोशल मीडियावर पसरणाऱ्या अफवांची मुंबई क्रिकेट असोसिएशन म्हणजेच एमसीएला जाणीव आहे', असे वक्तव्य सचिव अभय हडप यांनी अधिकृत निवेदनामार्फत म्हटले आहे. सूर्यकुमार यादवशी या संदर्भात संवाद साधल्याचेही हडप यांनी सांगितले आहे.

'एमसीएच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळीच सूर्यकुमार यादवशी संवाद साधला आहे आणि या चर्चा पूर्णपणे निराधार, खोट्या असल्याचे समोर आले आहे. या गोष्टी अफवा असल्याचे सूर्याने म्हटले आहे. तो मुंबईकडून खेळण्यासाठी वचनबद्ध आहे. मुंबईकडून खेळत असल्याचा त्याला अभिमान आहे. त्यामुळे सूर्याशी संबंधित खोटी आणि चुकीची माहिती पसरवू नये', असे आवाहन एमसीएने केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Veg Biryani Recipe : स्ट्रीट स्टाइल चटपटीत व्हेज बिर्याणी, एकदा खाल तर खातच रहाल

Accident : ऐन सणासुदीत ८ जणांचा अपघाती मृत्यू, पिकअप 100 फुटावरून कोसळला; चांदसैली अपघाताचा ग्राउंड रिपोर्ट समोर

Bihar Elections: एनडीएला मोठा धक्का; निवडणूक न लढताच गमावली एक जागा ? काय कारण, पराभूत उमेदवार कोण?

Isha Malviya: शेकी गर्ल ईशा मालवीयाचा नवा एथनिक लूक पाहिलात का?

Ind vs Aus : भारत-ऑस्ट्रेलिया वनडे सामना होणार रद्द? पर्थच्या हवामानाच्या अंदाजानं पहिल्या मॅचवर संकट

SCROLL FOR NEXT