sarfaraz khan with shreyas iyer yandex
Sports

Irani Cup 2024: सरफराजला संघात स्थान नाही, पृथ्वी शॉ अन् श्रेयस अय्यरचं कमबॅक; पाहा संपूर्ण संघ

Irani Cup 2024 Squads: येत्या १ ऑक्टोबरपासून इराणी कप स्पर्धेला सुरुवात होणार आहे. दरम्यान या स्पर्धेसाठी दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे.

Ankush Dhavre

भारतीय संघातील स्टार फलंदाज सरफराज खानला इंग्लंडविरुद्ध झालेल्या कसोटी मालिकेत पदार्पणाची संधी देण्यात आली होती. या मालिकेत त्याच्या फलंदाजीचा बोलबाला पाहायला मिळाला होता. या दमदार कामगिरीच्या बळावर त्याने आपलं भारतीय संघातील स्थान जवळजवळ निश्चित केलं.

आता बांगलादेशविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतही त्याला स्थान देण्यात आलं आहे. त्याला पहिल्या कसोटीत प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळालं नव्हतं. त्यामुळे अशी चर्चा सुरू होती की, सरफराज इराणी कपमध्ये मुंबईकडून खेळताना दिसेल. मात्र आता मुंबई आणि रेस्ट ऑफ इंडिया या दोन्ही संघांची घोषणा करण्यात आली आहे. या संघात सरफराज खानला स्थान देण्यात आलेलं नाही.

भारत आणि बांगलादेश या दोन्ही संघांमध्ये २ कसोटी सामन्यांची मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिला सामना भारताने २८० धावांनी जिंकला. तर मालिकेतील दुसरा सामना कानपूरमध्ये होणार आहे. या सामन्यात सरफराज खानला प्लेइंग ११ मध्ये स्थान मिळण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यातील कसोटी सामना २७ सप्टेंबरपासून सुरू होईल. तर इराणी कपला १ ऑक्टोबरपासून सुरू होईल.

अजिंक्य रहाणे बनला कर्णधार

गेल्या काही महिन्यांपासून भारतीय संघात कमबॅक करू पाहणाऱ्या अजिंक्य रहाणेकडे मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. यासह श्रेयस अय्यर, पृथ्वी शॉ यांना देखील मुंबई संघात स्थान मिळालं आहे. श्रेयस अय्यरला दुलीप ट्रॉफीसाठीही स्थान देण्यात आलं होतं. मात्र या स्पर्धेत तो चांगली कामगिरी करू शकला नव्हता. आता इराणी कपमध्ये चांगली कामगिरी करून त्याच्याकडे पुन्हा एकदा कमबॅक करण्याची संधी असणार आहे.

इराणी कपसाठी असे आहेत दोन्ही संघ:

मुंबई- अजिंक्य रहाणे (कर्णधार), पृथ्वी शॉ, आयुष म्हात्रे, मुशीर खान, श्रेयस अय्यर, सिद्धेश लाड, सूर्यांश शेडगे, हार्दिक तामोरे, सिद्धांत अधटराव, शम्स मुलानी, तनुष कोटियान, हिमांशु सिंग, शार्दुल ठाकुर, मोहित अवस्थी, मोहम्मद जुनैद खान, रॉयस्टन दियास.

रेस्ट ऑफ इंडिया- ऋतुराज गायकवाड़, अभिमन्यु ईश्वरन, साई सुदर्शन, देवदत्त पडिक्कल, ध्रुव जुरेल, ईशान किशन, मानव सुथार, सारांश जैन, प्रसिद्ध कृष्णा, मुकेश कुमार, यश दयाल, रिकी भुई, शाश्वत रावत, खलील अहमद, राहुल चाहर.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: निलंगा उपजिल्हाअधिकारी कार्यालयासमोर महादेव कोळी आदिवासी समाज बांधवांचा ठिय्या

Shocking: पोहण्यासाठी धरणात उडी मारली, परत बाहेर आलेच नाहीत; ४ जिवलग मित्रांचा मृत्यू

Shahapur : माता न तू वैरिणी! पोटच्या तीनही मुलींना आईनेच दिले जेवणातून विष; मुलींचा मृत्यू

Mhada: मुंबईतील म्हाडाच्या अधिकाऱ्याच्या पत्नीची आत्महत्या; आलिशान फ्लॅटमध्ये आयुष्याचा दोर कापला

Bihar News: उपमुख्यमंत्र्यांना जीवे मारण्याची धमकी; '२४ तासात स्रमाट चौधरी यांना गोळी घालेन'

SCROLL FOR NEXT