ms dhoni saam tv
Sports

Ms Dhoni Last Match: आजचा सामना असेल MS Dhoni चा अखेरचा सामना? वाचा काय आहे कारण

CSK VS SRH Match Preview: आयपीएल २०२३ स्पर्धेतील आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे

Ankush Dhavre

CSK VS SRH IPL 2023: आयपीएल २०२३ स्पर्धेतील आजचा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. गेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाला मुंबई इंडियन्स संघाकडून १४ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. तर चेन्नई सुपर किंग्ज संघाने गेल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध ८ धावांनी विजय मिळवला होता.

चेन्नई सुपर किंग्ज संघ सध्या गुणतालिकेत तिसऱ्या स्थानी आहे. हा सामना जिंकून चेन्नईचा संघ पॉइंट्स टेबलमध्ये वर जाण्याच्या प्रयत्नात असणार आहे. तर सनरायझर्स हैदराबाद संघ जोरदार कमबॅक करण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

या सामन्याबद्दल अधिक माहिती..

आजचा सामना : सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज

सामन्याची वेळ : संध्याकाळी ७:३० वाजता.

सामन्याचे ठिकाण: एमए चिदंबरम स्टेडियम, चेपॉक

लाईव्ह स्ट्रीमिंग : स्टार स्पोर्ट्स नेटवर्क आणि जिओ सिनेमा

आजचा सामना धोनीसाठी ठरणार अखेरचा सामना?

एमएस धोनी हा आयपीएल स्पर्धेच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्धणार आहे. चेन्नईने ५ सामन्यांपैकी ३ सामने जिंकले आहेत. मात्र चेन्नईच्या गोलंदाजांना हवी तशी कामगिरी करता आली नाहीये.

चेन्नईचे गोलंदाज अतिरिक्त धावा खर्च करताना दिसून येत आहेत. हे पाहता धोनीने म्हटले होते की, जर गोलंदाज अतिरिक्त धावा देत राहिले तर त्यांना नव्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली खेळावं लागेल.

गेल्या सामन्यात देखील चेन्नईच्या गोलंदाजांनी ११ अतिरिक्त धावा खर्च केल्या होत्या. हीच कामगिरी जर अशीच सुरू राहिली तर नक्कीच हा धोनीचा शेवटचा सामना असू शकतो. (Latest sports updates)

पिच रिपोर्ट :

एमए चिदंबरम स्टेडियमची खेळपट्टी ही फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल आहे. या खेळपट्टीवर फिरकी गोलंदाजांना मदत मिळते. त्यामुळे फलंदाजांना धावा करण्यात अडचणीचा सामना करावा लागतो. आतापर्यंत झालेल्या सामन्यांमध्ये फिरकी गोलंदाजांनी जास्त विकेट्स घेतल्या आहेत.

अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग 11 (CSK vs SRH playing 11):

चेन्नई सुपर किंग्स (CSK):

ऋतुराज गायकवाड, डेव्हॉन कॉनवे, अजिंक्य रहाणे, शिवम दुबे, मोईन अली, रवींद्र जडेजा, महेंद्रसिंग धोनी (कर्णधार आणि यष्टिरक्षक), मथिशा पाथीराना, तुषार देशपांडे, महिष थिक्षाना, आकाश सिंग.

सनरायझर्स हैदराबाद (SRH):

हॅरी ब्रूक, मयंक अग्रवाल, राहुल त्रिपाठी, एडन मॉर्कर्म (कर्णधार), अभिषेक शर्मा, हेनरिक क्लासेन (यष्टिरक्षक), अब्दुल समद, मार्को जेन्सन, भुवनेश्वर कुमार, मयंक मार्कंडे, टी. नटराजन

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Crime News: ओळखपत्र,मोबाईल हिसकावला नंतर खांबाला बांधलं; ड्युटीवर निघालेल्या लष्कर जवानासोबत टोल कर्मचाऱ्यांचं संतापजनक कृत्य

Pregnancy Tips : गर्भावस्थेतील मधुमेह नियंत्रणात ठेवणे का आवश्यक आहे?

Pandharpur: डॉल्बीच्या आवाजामुळे एकाचा मृत्यू, दंहीहंडीचा कार्यक्रम पाहायला आला अन्...; पंढरपुरात खळबळ

Hair Loss Remedie : टक्कल पडण्याची समस्या? हे घरगुती उपाय करतील मदत

Rahul Gandhi: व्होट चोरीवरून टोकदार प्रश्न, निवडणूक आयोगानं दिली उत्तरं; तुम्ही समाधानी आहेत का?

SCROLL FOR NEXT