SRH vs MI IPL 2023: SRH विरुद्धच्या सामन्यापूर्वी मुंबईला मोठा धक्का! संघातील प्रमुख गोलंदाजाबाबत समोर आली मोठी अपडेट

Jofra Archer: आज आयपीएल स्पर्धेत आणखी एक रोमांचक सामना पार पडणार आहे
mumbai indians
mumbai indians twitter
Published On

SRH VS MI IPL 2023: आज आयपीएल स्पर्धेत आणखी एक रोमांचक सामना पार पडणार आहे. आज होणाऱ्या सामान्यात मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. गेल्या सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने जोरदार कामगिरी करत कोलकाता नाईट रायडर्स संघावर विजय मिळवला होता.

मात्र एक प्रश्न आज होणाऱ्या सामन्यातही उपस्थित होतोय, तो म्हणजे जोफ्रा आर्चर आज खेळणार का? जाणून घ्या.

आयपीएल २०२२ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात मुबंई इंडीयन्स संघाने जोफ्रा आर्चरला ८ कोटींची बोली लावत आपल्या संघात स्थान दिले होते. तो या हंगामात खेळणार नव्हता तरीदेखील मुबंई इंडीयन्स संघाने त्याला आपल्या संघात स्थान दिले होते.

मुबंई इंडीयन्स संघाला असे वाटले होते की, जसप्रीत बुमराह आणि जोफ्रा आर्चरची जोडी आल्याने मुबंई इंडीयन्स संघ आणखी मजबुत होईल, मात्र असे काहीच झाले नाही. जसप्रीत बुमराह संपूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. तर जोफ्रा आर्चर दुखापतीमूळे खेळताना दिसून येत नाहीये.

mumbai indians
Virat Kohli Fined: गांगुली वादानंतर विराटच्या अडचणीत वाढ! आता BCCI ने केली मोठी कारवाई

आज जोफ्रा आर्चर खेळणार का?

आज होणाऱ्या सामन्यात देखील जोफ्रा आर्चरचं खेळणं कठीण दिसून येत आहे. कारण त्याची दुखापत आणखी वाढली आहे. आयपीएल स्पर्धा सुरु होण्यापूर्वी जोफ्रा आर्चर बांग्लादेश संघाविरुद्ध खेळताना दिसून आला होता. (Jofra Archer)

त्यानंतर तो आयपीएल स्पर्धेसाठी भारतात आला होता. पहिल्या सामन्यात त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. तो रिदममध्ये नसल्याचे दिसून आले होते. आता सनरायझर्स हैदराबाद संघाविरुद्ध होणाऱ्या सामन्यात देखील त्याचं खेळणं कठीण दिसून येत आहे. (Latest sports updates)

mumbai indians
Watch IPL 2023: हसून हसून व्हाल लोटपोट ! तिघांमध्ये टक्कर अन् चाैथ्यानेच घेतला झेल- VIDEO

अशी असू शकते मुंबई इंडियन्स संघाची संभावित प्लेइंग ११:

प्रथम फलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पियुष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ.

प्रथम गोलंदाजी केल्यास- रोहित शर्मा (कर्णधार), इशान किशन (विकेटकीपर), तिलक वर्मा, टीम डेव्हिड, कॅमेरॉन ग्रीन, नेहल वढेरा, हृतिक शोकीन, पीयूष चावला, रिले मेरेडिथ, जेसन बेहरेनडॉर्फ, अर्जुन तेंडुलकर.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com