Dhoni vs Kohli Saam Tv
Sports

IPL 2024: पुन्हा नाही होणार कोहली- धोनीचा सामना; ग्रुप स्टेजमध्ये मोठा बदल

Dhoni vs Kohli: आयपीएल २०२४ मध्ये आता महेंद्रसिंह धोनी आणि विराट कोहली यांच्यात आता पुन्हा सामना होणार नाही.

Bharat Jadhav

Dhoni vs Kohli In IPL 2024:

आयपीएल २०२४च्या पहिला चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात झाला. दोन्ही संघात भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते. दोन्ही कर्णधारमधील सामना पाहताना रसिकांचं मनोरंजन झालं. परंतु क्रिकेट प्रेमींना हा अनुभव पुन्हा अनुभवता येणार नाहीये. कारण आयपीएलकडून यंदा ग्रुपमध्ये स्टेजमध्ये बदल करण्यात आलाय.या बदलामुळे कोहली आणि धोनीमधील सामना परत पाहता येणार नाहीये. यावेळी १० संघांना अ आणि ब अशा दोन ग्रुपमध्ये विभागण्यात आले आहे. (Latest News)

चेन्नई आणि बेंगळुरूचा संघ ग्रुप ब मधे आहे. या स्पर्धेतील एका ग्रुपमधील दोन संघ एकदाच एकमेंकांविरुद्धात एकच सामना खेळतील.तर विरुद्धात असलेल्या ग्रुपमधील संघ दुसऱ्या ग्रुपमधील संघाशी दोन-दोन सामने खेळतील. यामुळे धोनी आणि कोहलीचा सामना पुन्हा अनुभवता येणार नाहीये.परंतु हे दोन्ही संघ पुन्हा प्लेऑप्समध्ये आमने-सामने येतील.

मुंबई इंडियन्स, कोलकाता नाईट रायडर्स, राजस्थान रॉयल्स, दिल्ली कॅपिटल्स आणि लखनौ सुपर जायंट्स यांना अ गटात ठेवण्यात आले आहे. तर ब गटात चेन्नई सुपर किंग्स, सनरायझर्स हैदराबाद, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, पंजाब किंग्ज आणि गुजरात टायटन्स यांना स्थान देण्यात आले आहे.

चेपॉक स्टेडियमवर झालेल्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूला ६ गडी राखून पराभव स्वीकारावा लागला. चेन्नईने हा सामना एकतर्फी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना बेंगळुरूने २० षटकांत ६ बाद १७३ धावा केल्या होत्या. बेंगळुरू संघासाठी यष्टीरक्षक फलंदाज अनुज रावतने ४८ धावांची सर्वात मोठी खेळी खेळली होती. यात ४ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश होता. त्यानंतर लक्ष्याचा पाठलाग करताना चेन्नई सुपर किंग्सने अवघ्या १८.४ षटकांत ४ गडी राखून विजय मिळवला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT