आज आयपीएल २०२४चा पाचवा सामना गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना झाला. हा सामना गुजरातच्या अहमदबाद येथील स्टेडियमवर झाला. मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी निवडली. प्रथम फलंदाजी करण्यासाठी उतरलेल्या गुजरात टायटन्सच्या फलंदाजांनी स्फोटक फलंगदाजी करत मुंबई समोर १६९ धावांचे आव्हान दिली. यंदाच्या आयपीएलमध्ये मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे आहे.(Latest News)
गुजरात आणि मुंबईच्या सामन्यादरम्यान हार्दिकची अरेरावी पाहायला मिळाली. त्याच्या या वागणुकीवर मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झाले आहेत. मुंबई संघाच्या कर्णधारपदाची जबाबदारी हार्दिक पांड्याकडे देण्यात आलीय. कर्णधारपद हार्दिककडे आल्याने या सामन्यात त्याचा 'हुकूम' माजी कर्णधारासह सर्वांना ऐकावा लागला. परंतु हार्दिकच्या अरेरावी वागणुकीवर रोहित आणि मुंबई इंडियन्सचे चाहते नाराज झालेत.
मुंबई संघाचा कर्णधार म्हणून मैदानात उतरलेल्या हार्दिक पांड्याचा स्वॅग काही निराळाच होता. नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत गुजरातच्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. त्यानंतर हार्दिकने स्वत: चेडू हातात घेत गोलंदाजी केली. पहिल्याच षटकात हार्दिकने ११ धावा दिल्या. त्याच दरम्यान हार्दिकने कर्णधार म्हणून केलेली अरेरावी अनेकांना आवडली नाही.
डावाच्या शेवटच्या षटकात हार्दिक पंड्या क्षेत्ररक्षण बदलत होता. यादरम्यान हार्दिकने मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्माचे क्षेत्र बदलले आणि त्याला ३० यार्डच्या बाहेर क्षेत्ररक्षणासाठी पाठवले. रोहित शर्मा ३० यार्डच्या आतच क्षेत्ररक्षण करतो. परंतु हार्दिकने त्याला या सामन्यात थेट सीमेरेषेकडे पाठवले. हार्दिकचं कृत्य अनेक मुंबईच्या चाहत्यांना आवडलं नाही आणि त्यांनी सोशल मीडियावर हार्दिकला ट्रोल करण्यास सुरुवात केली.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.