Mahendra Singh Dhoni X
Sports

MS Dhoni : पुढचा सामना खेळेन की नाही हे मलाही माहीत नाही, असं एमएस धोनी का म्हणाला? पाहा व्हिडीओ

Mahendra Singh Dhoni : चेपॉक स्टेडियमवर चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध पंजाब किंग्स हा सामना रंगला आहे. या सामन्यादरम्यान महेंद्रसिंह धोनीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

Yash Shirke

MS Dhoni : महेंद्रसिंह धोनीचा खराब फॉर्म सुरु आहे. आयपीएल २०२५ मध्ये एमएस धोनी सतत फ्लॉप होत आहे. या सीझननंतर धोनी पुन्हा आयपीएलमध्ये खेळताना दिसणार की नाही असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. अशातच महेंद्रसिंह धोनीने आयपीएलमध्ये खेळण्याबाबत महत्त्वपूर्ण विधान केले आहे. त्यामुळे धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आले आहे.

पंजाबचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला. श्रेयसने टॉस जिंकल्यानंतर प्लेईंग ११ वर भाष्य केले. त्याने ग्लेन मॅक्सवेल आयपीएलमधून बाहेर पडला असल्याचे सांगितले. मॅक्सवेलच्या बोटाला फ्रँक्चर असल्याने तो आज खेळणार नाही. त्याच्या जागी कुणाला संधी द्यावी हे अजूनही ठरले नसल्याचे अय्यरने म्हटले.

श्रेयस अय्यरनंतर महेंद्रसिंह धोनीशी डॅनी मॉरिसन यांनी संवाद साधला. धोनी बोलत असताना स्टेडियममधील सर्व चाहत्यांनी मोठ्याने जल्लोष केला. त्यावर 'तुझं स्वागत किती जोरदार होतंय. तू पुढच्या वर्षीही येथे येशील, असे समजावे का?' असा प्रश्न डॅनी मॉरिसन यांनी विचारला. प्रश्नाचे उत्तर देताना महेंद्र सिंह धोनी हसत म्हणाला, 'मी पुढच्या सामन्यात खेळण्यासाठी येईन का याची मला खात्री नाही'

'चाहत्यांचं हे प्रेम माझ्यासाठी गौरव आहे. आम्ही या सीझनमध्ये बहुतांश सामने घरच्या स्टेडियमवर खेळलो. पण घरच्या मैदानात खेळण्याचा फायदा आम्ही घेऊ शकलो नाही. सीझनमध्ये आम्ही संघात खूप बदल केले. यामागचं कारण खूप सोपं आहे. बरेच खेळाडू चांगली कामगिरी करत असतील, तर फेरबदल करता येतात. पण यंदा हे जमले नाही. याशिवाय फ्रेश ऑक्शननंतरचा हा पहिला सीझन आहे त्याचाही परिणाम झाला', असे वक्तव्य महेंद्रसिंह धोनी यांनी केले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Success Story: ब्युटी विथ ब्रेन! कोणत्याही कोचिंगशिवाय दुसऱ्या प्रयत्नात UPSC क्रॅक; IAS सलोनी वर्मा आहेत तरी कोण?

Viprit Rajyog: 365 दिवसांनंतर शुक्राने तयार केला विपरीत राजयोग; 'या' राशींचा गोल्डन टाइम होणार सुरु

Friday Horoscope : लग्न जुळणार, नोकरीचा प्रश्न मिटणार; ५ राशींच्या लोकांच्या आयुष्यात चमत्कार घडणार

Todays Horoscope: 'या' नोकरीमध्ये काही बदल होण्याची शक्यता; जाणून घ्या राशीभविष्य

Marathi vs Hindi Clash: परप्रांतीय व्यापारी मराठीच्या विरोधात मोर्चा; परप्रांतीयांमध्ये हिंमत येते कुठून?

SCROLL FOR NEXT