MS Dhoni may will play his last match in chennai know how csk can qualify in ipl playoffs amd2000 google
Sports

CSK Playoffs Scenario: आज धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार? CSK ला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी कसं असेल समीकरण?

MS Dhoni Last Match In Chennai: डबल हेडरच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेत आजचा दिवस अतिशय महत्वाचा असणार आहे . या हंगामात कोलकाता नाईट रायडर्स हा प्लेऑफ गाठणारा पहिला संघ ठरला आहे. तर आज २ सामने पार पडणार आहेत. हे दोन्ही सामने प्लेऑफच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे असणार आहेत. डबल हेडरचा पहिला सामना राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांमध्ये रंगणार आहे. तर दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत.

चेन्नईचं टेन्शन वाढणार?

हा एमएस धोनीचा चेपॉकच्या मैदानावरील शेवटचा सामना असणार आहे. कारण चेन्नईचा पुढील सामना बंगळुरूतील चिन्नास्वामीच्या मैदानावर होणार आहे. जर चेन्नईने अंतिम फेरीत प्रवेश केला, तर पुन्हा एकदा धोनी चेन्नईत खेळताना दिसून येऊ शकतो.

चेन्नईला पराभूत करताच राजस्थान रॉयल्स हा प्लेऑफमध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ ठरेल. तर चेन्नईने हा सामना जिंकल्यास, चेन्नेईचे प्लेऑफमध्ये जाण्याच्या चान्स आणखी वाढेल. मात्र चेन्नईने हा सामना गमावला, तर हा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर होऊ शकतो. कारण हा सामना गमावून पुढील सामना जिंकल्यास चेन्नईचा संघ जास्तीत जास्त १६ गुणांपर्यंत पोहचेल, असं झाल्यास चेन्नईला प्लेऑफमध्ये जाता येणार नाही.

धोनी चेन्नईत शेवटचा सामना खेळणार?

चेन्नईचा संघ आज चेन्नईमध्ये साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. तसेच धोनीचं हे शेवटचं आयपीएल हंगाम असल्याची चर्चा सुरु आहे. चेन्नईला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी चेन्नईला प्रबळ दावेदार मानलं जात आहे. आयपीएल २०२४ स्पर्धेतील क्वालिफायर २ आणि फायनलचा सामना चेन्नईत रंगणार आहे. जर चेन्नईचा संघ प्लेऑफमध्ये प्रवेश करु शकला नाही, तर आज होणार सामना हा धोनीचा चेन्नईच्या मैदानावरील शेवटचा सामना ठरेल.

RCB की DC कोण जाणार बाहेर?

तर दुसरा सामनाही प्लेऑफच्या दृष्टीने तितकाच महत्वाचा असणार आहे. कारण आरसीबी आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये जो संघ हा सामना जिंकणार, तो संघ प्लेऑफच्या शर्यतीत टीकून राहणार. तर पराभूत होणारा संघ प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणार आहे. यासह दोन्ही संघांना प्रार्थना करावी लागेल की, आज होणाऱ्या पहिल्या सामन्यात चेन्नईचा संघ पराभूत झाला पाहिजे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ind vs Eng : बेन स्टोक्ससोबत भरमैदानात बाचाबाची; रविंद्र जडेजानं सांगितलं नेमकं कारण

Ashadhi Ekadashi Upvas: आषाढी एकादशीला जास्त मेहनत न घेता घरीच बनवा हे ६ सोपे पदार्थ

Hruta Durgule : महाराष्ट्राची क्रश हृता दुर्गुळे सध्या काय करते ?

Jalebi Recipe: घरी आलेल्या पाहुण्यांसाठी ३० मिनिटात बनवा खमंग जिलेबी, नोट करा रेसिपी

Sushil Kedia : आम्ही जर आमच्या औकातीवर उतरलो तर...; दुसऱ्यांदा ट्वीट करत सुशील केडिया यांची राज ठाकरेंना धमकी

SCROLL FOR NEXT