ms dhoni  team india
Sports

MS Dhoni In Team India: BCCI चा मास्टरप्लान! World Cup साठी धोनीची टीम इंडियात होणार एंट्री?

MS Dhoni As Team India Head Coach: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड याने २०१९ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती.

Ankush Dhavre

MS Dhoni Coach: भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविड यांनी २०१९ मध्ये भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी स्वीकारली होती. भारतीय अंडर-१९ संघाला वर्ल्ड कप जिंकून देण्याऱ्या राहुल द्रविडकडून मोठ्या अपेक्षा होत्या. मात्र आपल्या कार्यकाळात तो हवी तशी कामगिरी करू शकला नाही.

भारतीय संघाला २ वेळेस आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याची संधी गमावली आहे. नुकताच भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला.

या सामन्यात देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ही कामगिरी पाहता भारतीय संघाच्या सपोर्ट स्टाफमध्ये बदल पाहायला मिळू शकतात.

राहुल द्रविडला दांडगा अनुभव आहे. हा अनुभव पाहता असं वाटत होतं की, राहुल द्रविड आयसीसीची ट्रॉफी जिंकून देण्याचा दुष्काळ संपवू शकतो. मात्र असं काहीच झालं नाही. गेल्या १ दशकापासून आयसीसीची ट्रॉफी जिंकण्याचा दुष्काळ सुरूच आहे.

राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्ड कप आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेचा अंतिम सामना गमावला. आता राहुल द्रविडला मुख्य प्रशिक्षक पदावरून काढून टाकण्याची मागणी जोर धरू लागली आहे.

रोहित शर्मा- राहूल द्रविडची होणार सुट्टी..

एमएस धोनीच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दमदार कामगिरी केली आहे. त्याने आयसीसी टी -२० वर्ल्ड कप २००७, आयसीसी वनडे वर्ल्ड कप २०११ आणि चॅम्पियन्स ट्रॉफी २०१३ स्पर्धेत भारतीय संघाला विजय मिळवून दिला होता.

धोनीने निवृत्ती जाहीर केल्यानंतर भारतीय संघाला आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नाही. आता आयसीसीची ट्रॉफी जिंकण्यासाठी बीसीसीआयचे सचिव जय शाह मोठा निर्णय घेऊ शकतात. आगामी वनडे वर्ल्ड कप स्पर्धा तोंडावर असताना एमएस धोनीला मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी दिली जाऊ शकते. (Latest sports updates)

रोहित शर्माचं कर्णधारपद जाणार?

रोहित शर्मा वनडे आणि टी-२० क्रिकेटमध्ये सुपरहिट आहे. मात्र कसोटी क्रिकेटमध्ये त्याला हवी तशी कामगिरी करता आलेली नाही. नुकताच पार पडलेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही रोहित शर्मा भारतीय संघाचा कर्णधार होता.

मात्र या सामन्यात भारतीय संघाला २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला होता. येत्या जुलै महिन्यात भारतीय संघ वेस्ट इंडिज दौऱ्यावर रवाना होणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघाला २ कसोटी सामन्यांची मालिका खेळायची आहे. या मालिकेत जर त्याने कर्णधार म्हणून चांगली कामगिरी केली नाही, तर त्याला कर्णधारपद गमवावं लागू शकतं

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बस ड्रायव्हर अन् शिक्षिकेच्या लव्हस्टोरीचा भयंकर शेवट; थर्टी फर्स्टच्या दिवशी घेतला टोकाचा निर्णय, परिसरात खळबळ

Maharashtra Politics: बंडखोराची कमाल, AB फॉर्मची झेरॉक्स, बंडखोरानं पक्षासोबत आयोगालाही गंडवलं

Maharashtra Live News Update : मोहोळ तालुक्यातील अनगर नगरपंचायत निवडणुकीत नवीन ट्विस्ट

नवरा भाजपला नडला, बायकोनं संसार मोडला? नवरा करी बंडखोरी, बायको गेली माहेरी

6,6,6,6,6,6....दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात मुंबई इंडियन्सचा फलंदाजाची वादळी खेळी, VIDEO

SCROLL FOR NEXT