
Shubman Gill Future Captain: ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. या पराभवानंतर रोहित शर्माच्या नेतृत्वावर टीका व्हायला सुरुवात झाली आहे.
अनेकांचं म्हणणं आहे की, त्याला कर्णधार पदावरून काढून टाकलं पाहिजे. या सर्व चर्चा सुरू असताना माजी भारतीय निवडकर्त्याने, रोहित शर्मानंतर भारतीय संघाचा पुढील कर्णधार कोण? याबाबत भविष्यवाणी केली आहे.
रोहितच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह..
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून २०९ धावांनी पराभवाचा सामना करावा लागला. यापूर्वी झालेल्या टी -२० वर्ल्ड कप २०२२ स्पर्धेत देखील भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला होता. ही कामगिरी पाहता अनेकांनी त्याला कर्णधारपदावरून काढून टाकण्याची मागणी केली आहे. या सर्व चर्चा सुरु असताना, माजी निवडकर्त्याने २३ वर्षीय खेळाडूला कर्णधारपदासाठी प्रबळ दावेदार असल्याचं म्हटलं आहे.
हा खेळाडू होणार पुढील कर्णधार..
भारतीय संघातील २३ वर्षीय फलंदाज शुभमन गिलने कमी वयात संघासाठी दमदार कामगिरी केली आहे. आपल्या फलंदाजी शैलीने त्याने स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्याने भारतीय संघासाठी तिन्ही फॉरमॅटमध्ये शतके झळकावली आहेत. त्याची ही कामगिरी पाहता माजी निवडकर्ते भूपेंदर सिंग यांनी मोठी भविष्यवाणी केली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, येणाऱ्या काळात शुभमन गिल हा भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो. (Latest sports updates)
हिंदुस्थान टाइम्ससोबत बोलताना भूपेंदर सिंग यांनी म्हटले की, 'मी आता काहीच बोलणार नाही. कारण आपल्याला त्याला एक महान फलंदाज होताना पाहायचं आहे. जर सर्व काही ठीक राहिलं तर येणाऱ्या काळात आपल्याला एक आक्रमक फलंदाज पाहायला मिळू शकतो.
त्याच्याकडे असा खेळ आणि व्यक्तिमत्व आहे जे पाहून असं दिसून येतं की, तो येणाऱ्या काळात भारतीय संघाचा कर्णधार होऊ शकतो.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.