नवरा भाजपला नडला, बायकोनं संसार मोडला? नवरा करी बंडखोरी, बायको गेली माहेरी

BJP Rebellion Affecting Family Life: उमेदवारी न मिळाल्यानं भाजपमध्ये नाराजांची संख्या मोठी आहे.मात्र बंडखोरीमुळे चक्क संसार मोडून पडण्याची वेळ आली आहे..नेमकं असं काय घडलं ? ज्यामुळे नवरा बायकोच्या नात्यात दुरावा निर्माण होऊ लागलाय...
BJP leaders Vinayak Dehankar and Archana Dehankar during the political turmoil triggered by ticket denial in Nagpur.
BJP leaders Vinayak Dehankar and Archana Dehankar during the political turmoil triggered by ticket denial in Nagpur.Saam Tv
Published On

उमेदवारी न मिळाल्यानं राज्यात अनेक ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांचा उद्रेक पाहायला मिळालाय. नागपूरमध्ये तर एका उमेदवाराची बंडखोरी थेट संसार मोडण्यावर आली आहे. भाजपच्या माजी महापौर अर्चना डेहनकर यांचे पती विनायक डेहनकर यांनी बंडखोरी करत भाजपच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. मात्र नव-याची ही कृती पत्नी अर्चना डेहनकर यांना आवडली नाही. नाराज होऊन त्यांनी थेट माहेर गाठलंय. नवऱ्याऐवजी पक्षाचा प्रचार करण्याचा निर्णयही अर्चना डेहनकरांनी घेतलाय.. तर निष्ठावंतांना डावल्यानं बंडखोरी केल्याचं पती विनायक डेहनकरांनी सांगितलंयं...

MID PTC (पराग ढोबळे) - भाजपशी अनेक वर्षे एकनिष्ठ राहूनही उमेदवारी नाकारल्यामुळे प्रभाग क्रमांक 17 मधून विनायक डेहनकर यांनी बंडखोरी केलीय. पक्षानं याआधीही त्यांना निवडणुकीत कधी संधी दिली नव्हती. यंदाच्या महापालिका निवडणुकीतही भाजपनं विनायक डेहनकरांऐवजी काँग्रेसमधून आलेल्या मनोज साबळेंना उमेदवारी दिल्यानं हा वाद आणखीच चिघळलाय.

भाजपमध्ये बंडखोरीला ऊत

सांगलीत माजी उपमहापौर युवराज बावडेकर यांच्यासह इच्छुकांची बंडखोरी

वसईत भाजप नगरसेवक किरण भोईर यांचे तिकीट कापल्यानं बंडखोरी

शिवडीत भाजप नेत्या जान्हवी राणेंना डावल्यानं बंडखोरी

छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक ठरले बंडखोरांचे हॉटस्पॉट

नाशिकमध्ये पक्षप्रवेशावरुन भाजप आमदारांचीच नाराजी

वर्षानुवर्षांच्या निष्ठावंतांना डावलल्यानं एकनिष्ठ कार्यकर्त्यांची बंडखोरी

पक्षनिष्ठा आणि बंडखोरीच्या राजकारणात नवरा-बायकोच्या नात्यांचाही बळी जातोय की काय? असचं चित्र निर्माण झालयं. मात्र एकूणच सगळीकडे पक्षासाठी दिवसरात्र काम करायचे आणि निवडणुकीच्या तोंडावर उपऱ्यांना संधी मिळत असल्याने निष्ठावंतांमध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. आता या वादाचा थेट फटका भाजपला विजयाचं गणित जुळवताना होतो का?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com