महेंद्रसिंह धोनी हा भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. धोनीने वर्ल्डकप, टी-२० वर्ल्डकप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी अशा स्पर्धांमध्ये भारताला विजेतेपद मिळवून दिले आहे. २०२० मध्ये धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. तो फक्त आयपीएलमध्ये खेळताना दिसतो. चेन्नई सुपर किंग्सचे चाहते त्याला प्रेमाने थाला म्हणतात. जेव्हा धोनी फलंदाजीसाठी मैदानात उतरतो, तेव्हा स्टेडियम टाळ्या, घोषणांनी दुमदुमून जाते.
धोनीचे चाहते त्याची एक झलक पाहण्यासाठी वेडे होतात. जेव्हा चेन्नई सुपर किंग्सचा सामना असतो आणि धोनी मैदानावर असतो, तेव्हा स्टेडियम तुडुंब भरलेले दिसते. भारताचा माजी फिरकीपटू हरभजन सिंहने एमएस धोनीच्या चाहत्यांबद्दल मोठी गोष्ट सांगितले. फक्त धोनीचे चाहते सच्चे चाहते आहेत, असे हरभजनने म्हटले आहे.
स्टार स्पोर्ट्सवर एका कार्यक्रमात हरभजन सिंह म्हणाला, जर कोणत्या खेळाडूचे सच्चे फॅन्स आहेत, तर ते धोनीचे आहेत. बाकी आजकाल तर सोशल मीडियावर अर्धेअधिक फॅन्स पैसे तयार होतात. जोपर्यंत ताकद आहे, शरीर खेळायची साथ देत आहे, तोपर्यंत खेळत राहा. धोनीने आयपीएलमध्ये खेळावे अशी फॅन्सची इच्छा आहे, त्यामुळेच ते धोनीचे सच्चे फॅन्स आहेत.
जे चेन्नई सुपर किंग्सचे फॅन्स आहेत, ते सच्चे फॅन्स आहेत. बाकी सोशल मीडियावर जे दाखवले जातं, ते पेड फॅन्स आहेत, त्यांच्या आकड्यांना सोडा. त्यांच्यावर आपण कधीतरी नंतर बोलू. यावेळेस एमएस धोनी ठीक-ठाक खेळले आहेत, असे वक्तव्य हरभजन सिंहने केले. हरभजनचे वक्तव्य ऐकल्यानंतर त्याच्यासोबत बसलेल्या आकाश चोप्रानेही होकार दिला. इतकंही खरं बोलू नका, असे आकाश चोप्रा म्हणाला.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.