ms dhoni can convince csk head coach stephen fleming for team india head coach amd2000 saam tv
क्रीडा

Team India Head Coach: टीम इंडियाचा हेड कोच निवडण्यासाठी एमएस धोनीवर मोठी जबाबदारी

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धा झाल्यानंतर भारतीय संघ टी-२० वर्ल्डकप स्पर्धा खेळण्यासाठी वेस्टइंडिजला रवाना होणार आहे. ही स्पर्धा झाल्यानंतर राहुल द्रविड यांचा मुख्य प्रशिक्षकपदाचा कार्यकाळ संपणार आहे. त्यामुळे बीसीसीआयने राहुल द्रविडच्या रिप्लेसमेंटचा शोध घ्यायला सुरुवात केली आहे. हे पद स्विकारण्यासाठी अनेक दिग्गज खेळाडूंची नावं समोर आली. मिळालेल्या माहितीनुसार बीसीसीआयला हेड कोच म्हणून स्टिफन फ्लेमिंगची नियुक्ती करायची आहे. त्यासाठी स्टिफन फ्लेमिंगचा नकार होकारमध्ये बदलायची जबाबदारी एमएस धोनीवर सोपवण्यात आली आहे.

स्टिफन फ्लेमिंगला भारतीय संघाचा पुढील मुख्य प्रशिक्षक बनण्याची ऑफर आहे. मात्र त्याने ही ऑफर अजूनही स्विकारलेली नाही. त्यामुळे ही जबाबदारी स्विकारण्यासाठी तयार करण्याची जबाबदारी एमएस धोनीकडे सोपवण्यात आली आहे. दोघेही आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून एकत्र आहेत. २००८ मध्ये झालेल्या आयपीएल हंगामात स्टिफन फ्लेमिंगने चेन्नई सुपर किंग्ज संघाचं प्रतिनिधित्व केलं होतं. त्यानंतर २००९ मध्ये त्याने या संघाच्या मुख्यप्रशिक्षकाची जबाबदारी स्विकारली. दोघेही १६ वर्षांपासून एकत्र काम करत आहेत. त्यामुळे दोघांचही बॉन्डिंग चांगलं आहे.

चेन्नई सुपर किंग्जचा संघ आयपीएल स्पर्धेतील सर्वात यशस्वी संघांपैकी एक आहे. चेन्नईने या स्पर्धेत ५ वेळेस जेतेपदावर नाव कोरलं आहे. या यशात स्टिफन फ्लेमिंगचा मोलाचा वाटा राहिला आहे. भारतीय संघालाही अनुभवी मुख्य प्रशिक्षकाची गरज आहे. त्यामुळे स्टिफन फ्लेमिंग हा योग्य पर्याय आहे.

मात्र तो सध्या चेन्नई सुपर किंग्ज संघासह टेक्सास सुपर किंग्ज, जोहांसबर्ग सुपर किंग्ज आणि साउदर्न ब्रेव संघाला प्रशिक्षण देत आहे. त्यामुळे त्याने अजूनही ही ऑफर स्विकारलेली नाही. आता धोनी स्टिफन फ्लेमिंगला भारतीय संघाचं मुख्य प्रशिक्षकपद स्विकारण्यासाठी तयार करणार का?हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Rahu Nakshtra Gochar: राहुच्या नक्षत्र गोचरमुळे 'या' राशी होणार मालामाल; नव्या नोकरीसह मिळणार अफाट पैसा

Maharashtra Politics: अखेर ठरलं! मविआचा जागा वाटपाचा तिढा सुटला, १००-८०-८० फॉर्म्युल्यावर शिक्कामोर्तब

Maharashtra News Live Updates: भाजपचे अनेक नाराज पदाधिकारी आज ठाकरेंची मशाल घेणार

BMC Job: बृहन्मुंबई महानगरपालिकेत नोकरीची संधी; मिळणार १४२००० पगार; असा करा अर्ज

Salman Khan News: 'बाबा सिद्दीकींपेक्षा वाईट हाल...', सलमान खानला पुन्हा धमकी; ५ कोटींची मागणी

SCROLL FOR NEXT