MS Dhoni Dwayne Bravo Video x
Sports

MS Dhoni : तो पाहा आला.. केकेआरच्या कोचला एमएस धोनी म्हणाला गद्दार, मैदानात नेमकं काय घडलं?

MS Dhoni Dwayne Bravo Video : चेपॉक स्टेडियमवर आज चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स हा सामना खेळला जाणार आहे. या सामन्यापूर्वी सीएसकेचा कर्णधार धोनी आणि केकेआरचा प्रशिक्षक ब्राव्होचा व्हिडीओ व्हायरल होत आहे.

Yash Shirke

CSK VS KKR IPL 2025 : आयपीएल २०२५ मधील २५ वा सामना आज एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. या सामन्यापूर्वी महेंद्रसिंह धोनी आणि ड्वेन ब्राव्हो यांच्या एका व्हायरल व्हिडीओची सोशल मीडियावर प्रचंड चर्चा होत आहे.

चेन्नई सुपर किंग्सने सोशल मीडिया अकांउट्सवर सीएसके विरुद्ध केकेआर सामन्यापूर्वी एक व्हिडीओ पोस्ट केला. या व्हिडीओमध्ये ड्वेन ब्राव्हो, महेंद्रसिंह धोनी आणि रवींद्र जडेजा एकमेकांशी गप्पा मारताना दिसतात. धोनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करताना दिसतो. तर जडेजा नेट्सच्या बाहेर असतो. अचानक त्यांना भेटायला ब्राव्हो येतो. ड्वेन ब्राव्होला पाहून महेंद्रसिंह धोनी गद्दार आला पाहा असे म्हणत टोमणा मारतो. तिघेही हसायला लागतात. ब्राव्हो पुढे जाऊन जडेजाला घट्ट मिठी मारतो. जडेजाशी बोलून हसत-हसत ब्रावो धोनीला भेटण्यासाठी नेट्स जवळ जातो. ब्रावो आणि धोनीचीही भेट होते. ते हळूच काहीतरी बोलतात आणि हसू लागतात.

ड्वेन ब्राव्हो हा कोलकाता नाईट रायडर्सचा गोलंदाजी विभागाचा मुख्य प्रशिक्षक आहे. त्याआधी म्हणजेच २०१८ ते २०२२ पर्यंत ड्वेन ब्राव्हो चेन्नई सुपर किंग्सचा महत्त्वपूर्ण सदस्य होता. त्याने सीएसकेला अनेक सामने जिंकवून दिले होते. निवृत्तीनंतर तो सध्या केकेआर संघाला गोलंदाजीचे प्रशिक्षण देत आहे. आज चेन्नई विरुद्ध केकेआर सामना असल्याने धोनीने गमतीने ब्रावोला गद्दार म्हटले आहे.

दरम्यान आजच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्त्व महेंद्रसिंह धोनी करणार आहे. ऋतुराज गायकवाड कोपराच्या फ्रॅक्चरने दुखापतग्रस्त असल्याने आयपीएल २०२५ मधून बाहेर पडला आहे. त्याच्या जागी आयपीएलच्या उर्वरित सामन्यांमध्ये एमएस धोनीकडे चेन्नईच्या कर्णधारपदाची धुरा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'मराठीचाच अजेंडा'; कोणताच झेंडा नाही, ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत

रशियाच्या हल्ल्याने युक्रेन हादरलं, ट्रम्पसोबत चर्चेनंतर रशियाचा हल्ला; युक्रेनची राजधानी रशियाकडून उध्वस्त?

IND vs ENG Test 2 Day 3: All Out! सिराजच्या भेदक माऱ्यापुढे इंग्लंडची टीम ढेपाळली; भारताकडे 180 धावांची आघाडी

Sushil Kedia : आमच्यासारखा जर खरंच पेटून उठला तर...व्यावसायिक सुशील केडिया यांनी राज ठाकरेंना डिवचलं

ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेस-राष्ट्रवादीची दांडी? ठाकरेंच्या मेळाव्यात मविआचा सहभाग? मराठीवरून मविआत फूट?

SCROLL FOR NEXT