
चिन्नास्वामी स्टेडियममध्ये काल लोकल बॉय केएल राहुल शो पाहायला मिळाला. राहुलने कालच्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या सामन्यात दिल्लीकडून खेळताना ५३ बॉल्सवर ९३ धावा केल्या. प्रसंगी संयमी, गरज पडल्यास आक्रमक खेळी करत राहुलने दिल्लीचा विजय निश्चित केला. त्याच्या दमदार खेळीमुळेच दिल्लीच्या संघाने कालचा सामना जिंकला.
नेहमी शांत राहणारा केएल राहुल कालच्या सामन्यात आक्रमक दिसला. सामना जिंकवून दिल्यानंतर जबरदस्त सेलिब्रेशन केले. त्याने हेल्मेट काढले. बॅट जमिनीवर फिरवून गोलाकार आकृती काढली आणि त्याच्या मध्यभागी बॅट जोरात आपटली. या कृतीतून केएल राहुल हे माझं घर, माझं स्टेडियम आहे, असे म्हणण्याचा प्रयत्न केल्याचे म्हटले जात आहे.
केएल राहुलने कालच्या सामन्यातील सेलिब्रेशनवर भाष्य केले. दिल्ली कॅपिटल्सने पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये केएल राहुल म्हणाला, या जागेचे (चिन्नास्वामी स्टेडियम) माझ्या आयुष्यात खास स्थान आहे. हे सेलिब्रेशन माझा आवडता चित्रपट 'कांतारा'शी प्रेरीत आहे. हे मैदान, ही जमीन, ही जागा जेथे मी लहानाचा मोठा झालो, ही माझी आहे.. हा संदेश मला कालच्या सेलिब्रेशनमधून द्यायचा होता.
'कांतारा' हा एक लोकप्रिय कन्नड चित्रपट आहे. हा चित्रपट २०२२ मध्ये प्रदर्शित झाला होता. रिषभ शेट्टी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन आणि निर्मिती केली होती. ते या चित्रपटाचे प्रमुख अभिनेते देखील होते. कांतारा चित्रपटाच्या शेवटच्या सीन्समध्ये रिषभ शेट्टी यांनी साकारलेले पात्र हातात लवकर घेते. जमिनीवर गोलाकार आकृती काढून मध्यभागी तलवार ठेवून ही जागा माझी आहे असे म्हणते. हीच कृती कालच्या बंगळुरू विरुद्ध दिल्ली सामन्यात राहुलने केली होती.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.