MS Dhoni Birthday: भारतीय क्रिकेटच्या इतिहासात 7 जुलै हा दिवस अतिशय महत्वाचा आहे. याच दिवशी थाला आणि कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या MS Dhoni चा जन्म झाला होता. तो आपला 42 वा वाढदिवस साजरा करतोय. या दिवशी पाहा एमएस धोनीच्या क्रिकेट कारकिर्दीतील टॉप 5 इनिंग.
नाबाद 91 धावा विरुद्ध श्रीलंका, 2011
वर्ल्डकप 2011 स्पर्धेतील अंतिम सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर पार पडला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघासमोर 275 धावांचं ठेवलं होतं.
या सामन्यात विराट कोहली आणि गौतम गंभीरने भारतीय संघाला सामन्यात टिकवून ठेवलं होतं. विराट बाद झाल्यानंतर युवराजऐवजी धोनी फलंदाजीला आला होता. या सामन्यात त्याने 79 चेंडूंचा सामना करत नाबाद 91 धावांची खेळी केली होती.
214 धावा विरुद्ध ऑस्ट्रेलिया, 2013
ऑस्ट्रेलियाचा संघ भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी पहिल्याच कसोटी सामन्यात एमएस धोनीने दुहेरी शतक झळकावत सर्वांना आश्चर्यचकित केले होते. अवघ्या 196 धावांवर भारतीय संघाचे 4 फलंदाज माघारी परतले होते. त्यावेळी 24 चौकार आणि 6 षटकार मारत धोनीने 214 धावा केल्या होत्या. (MS Dhoni Birthday)
134 धावा विरुद्ध इंग्लंड, 2016-17
इंग्लंडचा संघ 2016-17 मध्ये भारत दौऱ्यावर होता. त्यावेळी अवघ्या 25 धावांवर भारताचे 3 फलंदाज माघारी परतले होते. या वनडे सामन्यात धोनी आणि युवराज सिंगची जोडी चमकली होती. दोघांनी मिळून 256 धावा जोडल्या होत्या. धोनीने 122 चेंडुंचा सामना करत 134 धावा ठोकल्या होत्या. (Latest sports updates)
148 धावा विरुद्ध पाकिस्तान, 2004-05
एमएस धोनी आपल्या कारकिर्दीतील सुरुवातीच्या 4 सामन्यांमध्ये पूर्णपणे फ्लॉप ठरला होता. त्यानंतर त्याला तिसऱ्या क्रमांकावर खेळण्याची संधी मिळाली. या सामन्यात त्याने तुफान फटकेबाजी केली. पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने 123 चेंडुंचा सामना करत 148 धावा ठोकल्या होत्या. या डावात त्याने 15 चौकार आणि 4 षटकार मारले होते. (MS Dhoni)
183 विरुद्ध श्रीलंका, 2005
श्रीलंकेविरुद्ध केलेली 183 धावांची खेळी ही एमएस धोनीच्या वनडे कारकिर्दीतील सर्वात मोठी खेळी आहे. पहिल्या डावात श्रीलंकेने 298 धावांची खेळी केली होती. सचिन तेंडुलकर या डावात अवघ्या 7 धावांवर माघारी परतला होता. त्यानंतर एमएस धोनीने ताबडतोब फलंदाजी करत सर्वांची मने जिंकली होती. त्याने या डावात 15 चौकार आणि 10 षटकारांच्या मदतीने 183 धावा केल्या होत्या. (Top 5 Best Innings Of MS Dhoni)
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.