WI vs IND, Warm up Match: टीम इंडियाकडून खेळणार वेस्ट इंडिजचे 8 प्लेअर्स! 'या' कारणामुळे घेतला मोठा निर्णय

IND VS WI: भारतीय संघात वेस्ट इंडिजच्या ८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.
west indies
west indies saam tv
Published On

West Indies Player Will Play For India: भारतीय संघ वेस्ट इंडिज संघाविरुद्ध दोन हात करण्यासाठी सज्ज झाला आहे. दोन्ही संघांमध्ये २ कसोटी,३ वनडे आणि ५ टी -२० सामन्यांची मालिका रंगणार आहे. १२ जुलैपासून पहिला कसोटी सामना डॉमिनिकाच्या मैदानावर रंगणार आहे.

या कसोटी सामन्यापूर्वी भारतीय संघ बार्बाडोसमध्ये कसून सराव करताना दिसून येत आहे. बार्बाडोसमध्ये भारतीय संघाचा सराव सामना रंगणार आहे. या सामन्यासाठी भारतीय संघात वेस्ट इंडिजच्या ८ खेळाडूंचा समावेश करण्यात आला आहे.

west indies
Asia Cup 2023 Schedule: कुठे, केव्हा आणि कधी रंगणार आशिया चषक स्पर्धेतील सामने, जाणून घ्या एका क्लिकवर

आता तुम्हालाही प्रश्न पडला असेल की, भारतीय संघात वेस्ट इंडिजचे खेळाडू का? तर हा सराव सामना असणार आहे. या सामन्यात भारतीय संघातील खेळाडू गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव करताना दिसून येणार आहे. यासह भारतीय संघाचे ३ मोठे प्रश्न देखील सुटणार आहेत.

भारतीय संघासोबत खेळणार वेस्ट इंडिजचे ८ खेळाडू..

भारतीय संघाचा सराव सामना ५ आणि ६ जुलै रोजी खेळवला जाणार आहे. या २ दिवसीय सराव सामन्यात भारतीय संघातील खेळाडू एकमेकांविरुद्व खेळताना दिसून येणार आहेत. दोन संघ पूर्ण करण्यासाठी ८ खेळाडू कमी पडत होते.

त्यामुळे वेस्ट इंडिजच्या ८ खेळाडूंचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. ज्या खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आले आहेत, ते सर्व प्रथम श्रेणी क्रिकेट खेळणारे खेळाडू आहेत. या खेळाडूंना अजूनपर्यंत वेस्ट इंडिज संघासाठी पदार्पण करण्याची संधी मिळाली नाही. (Latest sports updates)

सराव सामन्यातून हे ३ प्रश्न सुटणार..

सराव सामन्यातून भारतीय संघासमोर असलेले ३ प्रश्न सुटणार आहेत. पहिला प्रश्न म्हणजे वेस्ट इंडिज संघासाठी डावाची सुरूवात कोण करणार? भारतीय संघासाठी डावाची सुरुवात कोण करणार, हा मोठा प्रश्नाचे असणार आहे. आतापर्यंत रोहित शर्मा आणि शुभमन गिल यांनी डावाची सुरुवात केली आहे. मात्र या दौऱ्यासाठी ऋतुराज गायकवाडला देखील संधी दिली गेली आहे.

भारतीय संघासमोर असलेला दुसरा मोठा प्रश्न म्हणजे चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी कोण करणार? चेतेश्वर पुजाराच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वालला संधी दिली गेली आहे. सराव सामन्यात तो तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करताना दिसून येऊ शकतो.

तिसरा आणि अतिशय महत्वाचा प्रश्न म्हणजे भारतीय संघाचं टीम कॉम्बिनेशन कसं असेल? भारतीय संघाला ही मालिका जिंकायची असेल तर योग्य प्लेइंग ११ सह मैदानात उतरावं लागणार आहे. त्यासाठी सराव सामना अतिशय मह्त्वाचा असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com