Happy Birthday MS Dhoni: धोनी मोठे केसं का ठेवायचा? जाणून घ्या MS Dhoni बद्दल माहित नसलेल्या खास गोष्टी

MS Dhoni Unknown Facts: या खास दिवशी जाणून घ्या एमएस धोनीबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी.
ms dhoni
ms dhonisaam tv
Published On

MS Dhoni Birthday: आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कॅप्टन कुल म्हणून ओळखला जाणारा एमएस धोनी आपला ४२ वा वाढदिवस साजरा करतोय. त्याच्या नेतृत्वखाली खेळताना भारतीय संघाने २००७ टी-२० वर्ल्डकप, २०११ वनडे वर्ल्डकप आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत विजय मिळवला.

भारतीय संघासाठी अशी कामगिरी करणारा तो एकमकेव कर्णधार आहे. दरम्यान या खास दिवशी जाणून घ्या एमएस धोनीबद्दल माहित नसलेल्या काही गोष्टी. (MS Dhoni Unknown Facts)

ms dhoni
Team India Playing 11: टीम इंडियाच्या कसोटी संघात मोठा बदल! रोहितसह 'हा' फलंदाज करणार डावाची सुरूवात

केवळ क्रिकेट नव्हे तर या खेळांमध्ये देखील होती रुची..

कॅप्टन कुल धोनी आपल्या कॅप्टनसीसह फलंदाजी आणि यष्टिरक्षणासाठी देखील ओळखला जातो. यष्टिरक्षण करत असताना तो वाऱ्याच्या वेगाने फलंदाजांची दांडी गुल करतो. तर फलंदाजी करताना तो गोलंदाजांचा घाम काढत असतो.

मात्र क्रिकेटसह धोनीला बॅडमिंटनची देखील आवड आहे. हे खूप लोकांना माहित असेल. तसेच शालेय संघात त्याने फुटबॉल खेळात गोलकिपरची भूमिका पार पडली आहे. (MS Dhoni Birthday)

मोठे केस असण्यामागचं कारण काय?

एमएस धोनीने जेव्हा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एंट्री घेतली होती त्यावेळी तो आपल्या लूकमुळे प्रचंड चर्चेत आला होता. मोठे केस असण्यामागचं लॉजिक काय? असा प्रश्न धोनीला अनेकदा विचारला गेला आहे.

तर यामागचं कारण असं की,एमएस धोनीला जॉन अब्राहमची हेअरस्टाईल खूप आवडायची. या हेअरस्टाईलची कॉपी करत एमएस धोनीने केस वाढवले होते. (Latest sports updates)

ms dhoni
Team India Playing 11: टीम इंडियाच्या कसोटी संघात मोठा बदल! रोहितसह 'हा' फलंदाज करणार डावाची सुरूवात

बाईक चालवण्याची आवड

एमएस धोनीला बाईक चालवायला आवडतं हे अनेकांना माहित असेल. त्याच्याकडे एकापेक्षा एक महागड्या बाईक्सचं कलेक्शन आहे. बाईकची आवड असणाऱ्या एमएस धोनीने मोटर रेसिंगची एक टीम खरेदी केली आहे. हे खूप कमी लोकांना माहित असेल.

पॅरा जंप करणारा पहिला खेळाडू..

पॅरा जंप करणारा एमएस धोनी हा पहिलाच खेळाडू आहे. त्याने भारतीय सैन्याच्या पॅरा रेजिमेंटमधून पॅरा जम्पिंग केली होती.

सर्वात जास्त कमाई करणारा खेळाडू...

भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी हा सर्वात जास्त कमाई करणाऱ्या खेळाडूंपैकी एक आहे. त्याचे वार्षिक उत्पन्न ५० कोटींच्या पूढे आहे. २०२० मध्ये त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम करण्याचा निर्णय घेतला होता. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला तरी तो जाहिरातीतून आणि आयपीएल स्पर्धेतून कोट्यवधींची कमाई करतो.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com