भारताचा स्टार खेळाडू रिषभ पंतसोबत १.६३ कोटींची फसवणूक झाल्याची घटना घडली आहे. हरियाणाच्या अंडर १९ संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मृणांक सिंगला चाणक्यपुरी पोलीस स्थानकातील पोलिसांनी फसवणूक प्रकरणी अटक केली आहे. रिषभ पंतची फसवणूक करणाऱ्या या आरोपीने हॉटेल ताज पॅलेसची ५.५३ कोटींची फसवणूक केली होती.
दिल्ली पोलिसांनी बुधवारी (२७ डिसेंबर) मृणांक सिंगला अटक केली आहे. हा आरोपी स्वतः हरियाणाचा क्रिकेटपटू आहे असं सांगून कित्येक लोकांची फसवणूक करायचा. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.
आपण मुंबई इंडियन्स संघाचा भाग आहे असं सांगून मृणांक ७ दिवस ताज पॅलेस हॉटेलमध्ये राहिला. जुलै २०२२ मध्ये त्याचं हॉटेलचं बिल ५.५३ लाखांच्या आसपास आलं होतं. हे बिल न देताच तो हॉटेलमधून निघून गेला होता.
इतकेच नव्हे तर कर्नाटकचा वरिष्ठ आयपीएस अधिकारी असल्याचं भासवून मृणांकने भारतातील प्रसिद्ध हॉटेलमध्ये जाऊन हॉटेल मालकांची फसवणूक केली आहे. या फसवणुकीला बळी पडणाऱ्यांच्या यादीत रिषभ पंतचा देखील समावेश आहे. मृणांकने महागड्या घड्या स्वस्तात मिळवून देईल असं आमिष दिलं होतं. त्याने २०२० मध्ये रिषभ पंतची १.६३ कोटींची फसवणूक केली होती. (Latest sports updates)
गेल्या वर्षी झाला होता अपघात.. (Rishabh Pant Car Accident)
रिषभ पंत हा डिसेंबर २०२२ मध्ये दिल्लीकडून रुडकीच्या दिशेने जात असताना त्याच्या कारचा अपघात झाला होता. त्याच्यावर देहराडुनच्या रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्याला मुंबईत शिफ्ट केलं गेलं होतं.
त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्याला स्वत:च्या पायावर चालता देखील येत नव्हतं. मात्र आता तो रिकव्हर होत असुन तो आगामी आयपीएल २०२४ स्पर्धेत खेळताना दिसून येऊ शकतो.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.