भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील चौथ्या दिवशी ॲक्शनपॅक क्रिकेट पाहायला मिळालं. ऑस्ट्रेलियाचे गोलंदाज भारतीय संघाला ऑलआऊट करण्याच्या प्रयत्नात होते.
तर दुसरीकडे भारतीय संघाच्या खालच्या फळीतील फलंदाजांनी पूर्ण जोर लावला आणि फॉलोऑन टाकला. शेवटच्या विकेटसाठी भारतीय फलंदाजांनी महत्वपूर्ण भागीदारी केली आणि संघाला २४६ धावांच्या पुढे पोहोचवलं.
यादरम्यान एक अशी घटना घडली, ज्यामुळे भारतीय संघाचा पराभव झाला असता. याला कारणीभूत ठरला असता, भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज. मात्र नशिबाने साथ दिली आणि मोठी चूक थोडक्यात याळलिम नेमकं काय घडलं? जाणून घ्या.
या सामन्यातील पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाने ४४५ धावांचा डोंगर उभारला होता. या धावांचा पाठलाग करताना, भारतीय संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. टॉप ऑर्डर, मिडल ऑर्डरचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले.
भारताकडून केएल राहूलने ८४ आणि रविंद्र जडेजाने ७७ धावांची खेळी करत भारतीय संघाला सामन्यात टिकवून ठेवलं. शेवटी बुमराह आणि आकाश दीपने भारतीय संघाची लाज राखली. या दोघांनी १० व्या विकेटसाठी महत्त्वपूर्ण भागीदारी केली आणि फॉलोऑनचा खतरा टळला.
तर झाले असे की, ६२ वे षटक सुरू असताना, रविंद्र जडेजा आणि मोहम्मद सिराजची जोडी मैदानावर होती. त्यावेळी जडेजाने एक धाव घेतली आणि सिराजला स्ट्राईक दिली. पुढच्याच बॉलवर सिराजनेही १ धाव घेण्याचा प्रयत्न केला.
मात्र पुढे आल्यानंतर त्याला कळालं की, जडेजाने त्याच्याकडे पहिलच नाहीये. क्षेत्ररक्षकाने चेंडू पकडला आणि थ्रो केला. जर डायरेक्ट थ्रो लागला असता, तर सुरू सिराजला बाद होऊन माघारी जावं लागलं असतं. त्यामुळे सिराजची विकेट लवकर गेली असती.
ज्यावेळी हे घडलं त्यावेळी सुनील गावसकर समालोचकाच्या भूमिकेत होते. त्यावेळी सुनील गावसकरांनी सिराजच्या फलंदाजीचा प्रश्नचिन्ह उपस्थित केले. ते म्हणाले, ' अजूनही सिराज चर्चा करतोय, नेमकं काय होतंय? षटकातील एक चेंडू शिल्लक आहे. तुम्हाला फक्त स्ट्राइकवर टिकून राहायचंय. तू ९ व्या क्रमांकावर खेळतोय. त्यामुळे तुला संघाचा विचार करावा लागेल. तू अशी रिस्की धाव घेऊच शकत नाही.'
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.