Mohammed Siraj saam tv
Sports

Mohammed Siraj: 6,6,6,0,4...! सिराजची तुफान फलंदाजी; भारताने सामना जिंकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी केलं असं की...!

Mohammed Siraj batting: मोहम्मद सिराजने श्रीलंका इलेव्हनविरुद्ध अवघ्या १५ चेंडूत नाबाद ३२ धावा करत भारताला रोमांचक विजय मिळवून दिला. शेवटच्या षटकात सलग तीन षटकार ठोकल्यानंतर श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजची बॅट हातात घेऊन मजेशीरपणे तपासली.

Surabhi Jayashree Jagdish

मोहम्मद सिराज त्याच्या गोलंदाजीने अनेकदा फलंदाजांची दाणादाण उडवलीये. पण यावेळी सिराजने चक्क फलंदाजीने अशी कमाल केली की, श्रीलंकेचे खेळाडूही थक्क झाले होते. सामना संपल्यानंतर त्यांनी सिराजची बॅट हातात घेतली आणि तो चक्क तपासून पाहिली. सिराजच्या बॅटमध्ये एवढी ताकद आली कुठून, असा प्रश्नच कदाचित त्यांना पडला असावा.

कोलंबोमध्ये श्रीलंका इलेव्हनविरुद्ध झालेल्या वॉर्म-अप सामन्याच्या तिसऱ्या आणि अखेरच्या दिवशी हा भन्नाट प्रकार पाहायला मिळाला. श्रीलंकेने आपली दुसरी डाव 200/6 रन्सवर घोषित करण्यात आला. पहिल्या डावात भारत 6 रन्सने पिछाडीवर होता. त्यामुळे भारतासमोर सामना जिंकण्यासाठी 207 रन्सचं लक्ष्य होतं.

भारताच्या डावाची सुरुवात यशस्वी जैयस्वाल आणि शुभमन गिल यांनी दमदार केली. दोघांनी शतकी खेळी करत भारताला विजयाच्या जवळ नेलं. मात्र काही वेळाने हे चित्र बदलताना दिसून आलं. भारताला विजयासाठी शेवटच्या षटकात 16 रन्सची गरज होती. त्यामुळे सामना कदाचित ड्रॉ होईल असं वाटू लागलं होतं.

मोहम्मद सिराजची तुफान फटकेबाजी

श्रीलंका इलेव्हनकडून दिवसातील शेवटची ओव्हर नुवंताने टाकली. सिराजने पहिल्याच चेंडूवर आपला पाय बाजूला घेत काऊ कॉर्नरच्या दिशेने जोरदार सिक्स लगावली. दुसरा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर फुल लेंथवर होता. सिराजने त्यावरही कोणतीही चूक न करता थेट सिक्स मारला. आता भारताला विजयासाठी फक्त 4 रन्स हवे होते. तिसऱ्या चेंडूवर सिराजने मिडविकेटच्या वरून आणखी एक षटकार ठोकला आणि भारताने सामना 6 विकेट्सने जिंकला.

सिराजने अवघ्या 15 चेंडूंमध्ये नाबाद 32 रन्सची तुफानी खेळी केली. त्याच्या या खेळीत 4 सिक्स आणि एका चौकाराचा समावेश होता. शेवटच्या ओव्हरमध्ये त्याने सलग तीन सिक्स ठोकत भारताला विजय मिळवून दिला.

श्रीलंकेच्या खेळाडूंनी सिराजची बॅटच तपासली

सिराजच्या या तुफानी फलंदाजीनंतर श्रीलंकेचे खेळाडूही चांगलेच आश्चर्यचकित झाले होते. सामना संपल्यानंतर मोहम्मद सिराज श्रीलंकेच्या खेळाडूंशी हात मिळवण्यासाठी गेला. त्यावेळी त्यांनी सिराजची बॅट हातात घेतली आणि ती मजेशीर पद्धतीने तपासायला सुरुवात केली.

सिराजने त्याच्या बॅटमधून इतके मोठे फटके कसे निघाले याचंच आश्चर्य त्यांना वाटत होतं. कारण सिराजने ज्या पद्धतीने फटके मारले ते एखाद्या फलंदाजांनी लाजवतील असे होते. त्यामुळे श्रीलंकेच्या खेळाडूंनी थट्टा-मस्करी करत सिराजची बॅटच तपासून पाहिली. सिराजपूर्वी दुसऱ्या दिवसाच्या शेवटच्या ओव्हरमध्ये गुरनूर बरारनेही अशीच तुफानी फलंदाजी केली होती.

15 ऑगस्टपासून पहिला टेस्ट सामना

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टेस्ट सामना 15 ऑगस्टपासून सुरू होणार आहे. हा सामना गॉल इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. त्यानंतर सिरीजपूर्वी दुसरा टेस्ट सामना 23 ऑगस्टपासून सिंहली स्पोर्ट क्लब स्टेडियमवर होणार आहे. हे दोन्ही टेस्ट सामने भारतीय वेळेनुसार सकाळी 10 वाजता सुरू होणार आहेत.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart failure symptoms: हार्ट फेल्युअर होण्याच्या काही तासांपूर्वी दिसतात हे 5 बदल, तिसरं लक्षण दिसताच डॉक्टरकडे धावा

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोनं झालं स्वस्त, 10 तोळा सोन्यात 14,700 रुपयांची घसरण; वाचा 18k- 22k आणि 24k चे दर

भीषण अपघात! मिनीबस अन् ट्रकची जोरदार धडक; ५ जणांचा जागीच मृत्यू, ७ जण मृत्यूशी देतायत झुंज

LPG Price September : 1 सप्टेंबरपासून LPG-PNG ग्राहकांसाठी मोठे बदल! सिलेंडरच्या दरांपासून e-KYC पर्यंत जाणून घ्या अपडेट्स

Clove Water Benefits: सलग १० दिवस लवंगाचं पाणी प्यायल्याने शरीरात काय बदल होतात? जाणून घ्या

SCROLL FOR NEXT