IND vs SL: टीम इंडियाला जबरदस्त झटका, मॅचविनर स्टार खेळाडू श्रीलंका दौऱ्यातून आऊट, शुभमन गिलबाबतही मोठी अपडेट

ind vs sl sai sudharsan ruled out sri lanka test: भारत आणि श्रीलंका यांच्यात १५ ऑगस्टपासून कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. स्टार फलंदाज साई सुदर्शन दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर झालाय.
भारतीय संघाला जोरदार झटका, स्टार फलंदाज संघाबाहेर
भारत विरुद्ध श्रीलंका कसोटी मालिकेला सुरुवात होत आहे. saam tv
Published On

Sai Sudharsan Ruled Out: भारत आणि श्रीलंका यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका १५ ऑगस्टपासून सुरू होत आहे. जसप्रीत बुमराह आधीच दुखापतीमुळे मालिकेतून बाहेर गेला आहे. साई सुदर्शन या मालिकेत खेळणार की नाही यावर साशंकता होती, पण आता याबाबत मोठी माहिती समोर आली आहे. रिपोर्टनुसार, साई सुदर्शन श्रीलंकेविरुद्धच्या महत्त्वाच्या कसोटी मालिकेतून बाहेर पडला आहे. तो पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकला नाही.

साई सुदर्शन आऊट

अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यानंतर साई सुदर्शनच्या डाव्या पायाला दुखापत झाली होती. सुदर्शनला श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघात स्थान दिलं होतं. त्याच्या फिटनेसच्या आधारेच त्याची निवड केली जाईल, असे बीसीसीआयने (BCCI) स्पष्ट केले होते. सुदर्शन बीसीसीआयच्या सीओईमध्ये राहून सराव करत होता. ८ ऑगस्ट रोजी सुदर्शनच्या खेळण्याबाबत अपडेट समोर आले. दैनिक जागरणच्या वृत्तानुसार, साई सुदर्शन पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकलेला नाही, त्यामुळे तो श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेला मुकला आहे.

शुभमन गिलबाबतही महत्वाची अपडेट

सराव करताना शुभमन गिलच्या बोटाला दुखापत झाली होती. तो श्रीलंका क्रिकेट इलेव्हन विरुद्धचा सराव सामना खेळला नाही. टाइम्स ऑफ इंडियाच्या वृत्तानुसार, गिल आता दुखापतीतून सावरला आहे. संघ व्यवस्थापन त्याच्याबाबत कोणताही धोका पत्करू इच्छित नाही. याच कारणामुळे तो सराव सामन्यातून बाहेर आहे, पण गॉल येथे होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यासाठी तो पूर्णपणे फिट असेल.

श्रीलंका दौऱ्यासाठी भारतीय संघ :

शुभमन गिल (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), यशस्वी जयस्वाल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मानव सुथार, आकिब नबी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा, गुरनूर ब्रार, देवदत्त पडिक्कल, सारांश जैन.

भारतीय संघाला जोरदार झटका, स्टार फलंदाज संघाबाहेर
Team India: टीम इंडियाचा कर्णधार बदलला; 'या' अनुभवी खेळाडूकडे सोपवली संघाची धुरा, वाचा काय आहे कारण?

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com