Mohammed Siraj Ipl20.com
Sports

Mohammed Siraj : सिराज करतोय आशा भोसलेंच्या नातीला डेट? व्हायरल फोटोमुळे चर्चांना उधाण

Mohammed Siraj Dating Rumours : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजचा फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये सिराजसोबत एक तरुणी देखील आहे. ही तरुणी आशा भोसले यांची नात असल्याची माहिती समोर आली आहे.

Yash Shirke

Mohammed Siraj News : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये तो झळकला होता. या दौऱ्यामध्ये फारशी चांगली कामगिरी न केल्याने त्याला चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये त्याची निवड झाली नाही असे म्हटले जात आहे. पण आता सिरात वेगळ्याच कारणासाठी चर्चेत आहे. सिराजचा एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

मोहम्मद सिराजच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या फोटोमध्ये सिराजसह एक तरुणी आहे. या तरुणीचे नाव जनाई भोसले आहे. जनाई ही आशा भोसले यांची नात आहे. आपल्या आजीप्रमाणे जनाईदेखील गायन क्षेत्रामध्ये सक्रीय आहे. गायनाशिवाय ती अभिनय देखील करते. जनाई आणि सिराज यांच्या फोटोमुळे चर्चांना उधाण आले आहे.

जनाई भोसलेने मुंबईच्या बांद्रामध्ये २३ वा वाढदिवस साजरा केला. या बर्थडे पार्टीला आशा भोसले, अभिनेता जॅकी श्रॉफ, क्रिकेटर श्रेयस अय्यर यांच्यासह अनेक सेलिब्रिटी हजर होते. मोहम्मद सिराजही पार्टीत उपस्थित होता. जनाईने पार्टीतले फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले. या पोस्टमध्ये तिच्या आणि सिराजच्या फोटोने सर्वांचे लक्ष वेधले.

व्हायरल फोटोमुळे मोहम्मद सिराज आणि जनाई भोसले एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा होत आहेत. सिराजच्या चाहत्यांनी या पोस्टवर मजेशीर कमेंट्स केल्या आहेत. काही चाहत्यांना जनाई भोसलेला 'भाभी' असे म्हटले आहे. तर काहींना डीसीपी सिराज लवकरच लग्न करणार आहे असे म्हटले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Hindi Language Row: आर्थिक गणित जुळवण्यासाठी व्यापाऱ्यांना त्रास, खंडणी नाही दिली म्हणून...; प्रताप सरनाईकांचे मनसैनिकांवर गंभीर आरोप|VIDEO

Nashik Crime : लूटमारीच्या उद्देशातून हत्या; चामर लेणी येथील ट्रक चालकाच्या खुनाचा उलगडा

Pune MNS : 'ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात'; पुण्यात मनसेचं आंदोलन, एकनाथ शिंदेंचा केला निषेध

Maharashtra Live News Update: ठाण्याचा वाघ गुजरातच्या पिंजऱ्यात; पुण्यात मनसेकडून एकनाथ शिंदेंचा निषेध

Raj Thackeray: राज ठाकरेंच्या बापाचा महाराष्ट्र आहे का? भाजपचे माजी प्रवक्ता नवीन जिंदाल यांचं ट्विट | VIDEO

SCROLL FOR NEXT