Virendra Sehwag: हार्दिक, शमीनंतर विरेंद्र सेहवागचाही काडीमोड? काय आहे व्हायरल मेसेजमागचं सत्य?

Virendra Sehwag Divorce Viral Message: माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागचा घटस्फोट झाल्याचा दावा सध्या सोशल मीडियावरून केला जात आहे. मात्र खरंच सेहवागचा घटस्फोट झालाय का? याबाबतचा रिपोर्ट आपण पाहूया.
Virendra Sehwag
Virendra Sehwag Divorce Viral Messageeconomics times
Published On

माजी क्रिकेटर विरेंद्र सेहवागचा घटस्फोट झाल्याचा दावा सध्या सोशल मीडियावरून केला जातोय. मात्र खरंच सेहवागचा घटस्फोट झालाय का? की घटस्फोटाची अफवा पसरवली जातेय? याची आम्ही पडताळणी केली. त्यावेळी काय सत्य समोर आलं पाहुयात. माजी क्रिकेटपटू विरेंद्र सेहवाग असं का बोलतोय? सेहवागला पत्नीची एवढी भीती का वाटतेय? याचीच आता चर्चा जोरदार रंगतेय.

कारण, सध्या सोशल मीडियावर विरेंद्र सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा रंगलीय. 20 वर्षे सुखाने सुरू असलेल्या नात्यात आता कुणाची तरी नजर लागल्याचं बोललं जातंय.मात्र, खरंच सेहवाग आणि आरती अहलावत हिचा घटस्फोट झालाय का? की ही अफवा आहे? हे लाखो क्रिकेटप्रेमींना जाणून घ्यायचं आहे. त्यामुळे याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या टीमने पडताळणी सुरू केली. त्याआधी मेसेजमध्ये काय दावा केलाय पाहुयात.

व्हायरल मेसेज

सेहवाग आणि आरती गेल्या काही महिन्यांपासून वेगळे राहत आहेत. सेहवाग आणि आरतीने इन्स्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केलंय. त्यामुळे दोघेही घटस्फोट देऊ शकतात. हा मेसेज प्रचंड व्हायरल होत असल्याने याची सत्यता जाणून घेण्यासाठी आमच्या व्हायरल सत्य टीमने याबाबत माहिती मिळवली.त्यावेळी आमच्या पडताळणीत काय सत्य समोर आलं पाहुयात.

Virendra Sehwag
IND vs ENG: आर्चरने 150.3KMPH च्या स्पीडने टाकला बॉल, तिलक वर्माने रॉकेट स्पीडने पाठवला मैदानाबाहेर - VIDEO

व्हायरल सत्य /साम इन्व्हिस्टिगेशन

सेहवागच्या घटस्फोटाची चर्चा फक्त सोशल मीडियात

घटस्फोटाबाबत सेहवागने अधिकृत माहिती दिली नाही

सेहवाग-आरती अहलावतचं लग्न एप्रिल 2004 साली झालं

लग्नाआधी 3 वर्षे एकमेकांना डेट केले होतं

सेहवाग आणि आरतीला आर्यवीर, वेदांत 2 मुलं आहेत

दोन्ही मुलं क्रिकेटमध्ये करिअर करतायत

Virendra Sehwag
Maharashtra Kesari : पुण्याची भाग्यश्री फंड ठरली महिला महाराष्ट्र केसरीची मानकरी, कोल्हापूरच्या अमृता पुजारीला केलं चितपट

विरेंद्र सेहवागने 2 हजारच्या दशकात क्रिकेटचं मैदान गाजवलं. त्याची स्टाईल अनेकजण फॉलो करायचे. घरोघरी त्याचे अजूनही फॅन्स आहेत.मात्र, आता असं काय झालं की सेहवाग आणि पत्नीच्या नात्यात दरी निर्माण झालीय.आमच्या पडताळणीत खरंच घटस्फोट झालाय की नाही हे स्पष्ट झालेलं नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर सुरू असलेल्या बातम्यांमुळे सेहवागचे चाहते प्रचंड अस्वस्थ आहेत

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com