भोंदू खरातनंतर CA चे पराक्रमाने खळबळ, उद्योगपतीची संपत्ती पाहून पाठवायचा वेगवेगळ्या बाबांकडे, सगळी यादीच समोर

Ashok Kharat Fake Baba Financial Scam Details: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात आता आर्थिक गैरव्यवहाराचा मोठा खुलासा समोर येत आहे. सीए ललित पोफळे यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात असून हवाला व्यवहार आणि शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक उलाढालींची पोलीस सखोल चौकशी करत आहेत.
Financial links in the Ashok Kharat scam surface as CA and trust transactions come under investigation.
Financial links in the Ashok Kharat scam surface as CA and trust transactions come under investigation.Saam tv
Published On

भोंदूबाबा अशोक खरातचे नवनवीन कारनामे समोर येत असताना आता त्याच्या आर्थिक गैरव्यवहारवर देखील टाच लागली आहे. यामध्ये काही व्यवहार संशयास्पद असून हवालाच्या माध्यमातून खरातने शेकडो कोटी परदेशात पाठवल्याचा आरोप केला जात आहे. खरातच्या शिवनिका ट्रस्टच्या आर्थिक व्यवहाराचा देखील पोलीस तपास करत असून 2018 मध्ये फक्त 4 लाखांची उलाढाल असलेल्या या ट्रस्टची मालमत्ता आता कोट्यावधीमध्ये सापडली आहे.

Financial links in the Ashok Kharat scam surface as CA and trust transactions come under investigation.
अशोक खरातचा शालार्थ आयडी घोटाळ्यात सहभाग? धक्कादायक माहिती समोर; शिक्षण क्षेत्रात खळबळ

हे सर्व आर्थिक व्यवहार सांभाळत असलेला शिवनिका ट्रस्टचा संचालक CA ललित पोफळे हा आता पोलिसांच्या रडारवर असल्याचे सांगितले जात असून त्याची देखील चौकशी होण्याची शक्यता आहे. तर CA ललित पोफळे याने स्वतःचा बचाव करण्यासाठी भोंदू खरातच्या विरोधात तक्रार करण्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेल्याचे सांगितले जात आहे.

Financial links in the Ashok Kharat scam surface as CA and trust transactions come under investigation.
Ashok Kharat: अशोक खरात खायचा शक्तिवर्धक गोळ्या, अतिसेवनामुळे अर्धांगवायूचा झटका; तपासातून धक्कादायक माहिती उघड

आर्थिक क्षमतेनुसार ठरवला जायचा बाबा

उद्योजकांच्या आर्थिक क्षमतेनुसार त्यांना ललित पोफळे हा वेगवेगळया व्यक्तिंकडे नेत असायचा. 1000 कोटींपेक्षा जास्त उलाढाल असलेल्या उद्योजकांना बंगळूरुतील लक्ष्मण महाराज, 500 कोटींपेक्षा जास्त असेलल्याना भोंदू अशोक खरात तर 200 कोटींपेक्षा जास्त असलेल्या सुजीत देशमुख यांच्याकडे नेण्यात येत होते. तसेच रघुनाथ येमुळ या ज्योतिषाकडे अनेक कस्टमर नेण्यात आले होते.

Financial links in the Ashok Kharat scam surface as CA and trust transactions come under investigation.
Navi Mumbai: खळबळजनक! नवी मुंबईत २ शाळकरी मुलांनी संपवलं जीवन; पोलीस तपासातून समोर आलं चक्रावून टाकणारं कारण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील विधानसभेत या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून अशोक खरात आणि त्यांच्याशी संबंधित सर्व ट्रस्टची सखोल चौकशी केली जाईल अशी ग्वाही दिली आहे. एकीकडे चौकशीमध्ये रोज धक्कादायक खुलासे समोर येत असताना दुसरीकडे सीए ललित पोफळेने दाखल केलेल्या FIR मुळे प्रकरणाला कायदेशीरवळण मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुढे आणखी काय माहिती समोर येते याकडे सर्व राज्याचे लक्ष लागले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com