विराट कोहली, श्रेयस अय्यरच्या तुफान फटकेबाजी आणि शमीच्या भेदक गोलंदाजीच्या बळावर भारतीय संघाने मोठा विजय मिळवला आहे. वर्ल्डकप सेमीफायनलच्या भारतीय संघाने न्यूझीलंडचा धुव्वा उडवला. यासह अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. भारतीय संघाच्या विजयात ५ खेळाडूंचं मोलाचं योगदान आहे.
विराट अन् श्रेयस अय्यरचं शतक...
भारतीय संघाला अंतिम फेरीत पोहचवण्यात विराट कोहली आणि श्रेयस अय्यर यांचं मोठं योगदान आहे. या दोघांनीही प्रथम फलंदाजी करताना शतकं झळकावली. विराट कोहलीबद्दल बोलायचं झालं तर त्याने ११३ चेंडूत ११७ धावांची खेळी केली.
या खेळी दरम्यान त्याने ९ चौकार आणि २ षटकार मारले. तर श्रेयस अय्यरने अवघ्या ७० चेंडूत १०५ धावा केल्या. या खेळी दरम्यान त्याने ४ चौकार आणि ८ गगनचुंबी षटकार मारले. या दोघांनी संघाला मोठी धावसंख्या उभारण्यात मोलाचं योगदान दिलं. ५० षटक अखेर भारतीय संघाने ३९७ धावांचा डोंगर उभारला.
रोहित - गिलची दमदार सुरुवात..
या सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघाकडून शुभमन गिल आणि रोहित शर्माची जोडी मैदानावर आली. रोहितने पहिल्या षटकापासूनच हल्लाबोल करायला सुरुवात केली.
त्याने २९ चेंडूत ४७ धावा चोपल्या. तर गिलने नाबाद ८० धावांची खेळी केली. गिलने आपल्या खेळी दरम्यान ८ चौकार आणि ३ षटकार मारले. ही जोडी देखील भारताच्या विजयाची तितकीच हकदार आहे. (Latest sports updates)
मोहम्मद शमीची गोलंदाजी..
मोहम्मद शमी या विजयाचा खरा नायक ठरला आहे. शमीने या सामन्यात भेदक मारा करत ९.५ षटकात ५७ धावा खर्च करत ७ फलंदाजांना माघारी धाडलं. मुख्य बाब म्हणजे शमीने न्यूझीलंडचा टॉप ऑर्डर फोडून काढला.
जेव्हा विलियम्सन आणि मिचेलची जोडी जमली होती. त्यावेळी शमीने ही जोडी फोडली. विलियम्सन या सामन्यात ६९ धावा करत माघारी परतला.
त्यानंतर फलंदाजांची रांग लागली. शमीने या सामन्यात विलियम्सन, डेवोन कॉनवे, रचिन रविंद्र, टॉम लेथम, टीम साऊदी आणि लॉकी फर्ग्युसनला बाद करत माघारी धाडलं.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.