mohammed shami twitter
Sports

SMAT 2024: 4,4,4,6,6..मोहम्मद शमीने घातला राडा! गोलंदाजीनंतर फलंदाजीतही चमकला

Mohammed Shami Batting In Syed Mushtaq Ali Trophy: सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत चंडीगडविरुद्धच्या सामन्यात मोहम्मद शमीने फलंदाजीत दमदार कामगिरी केली आहे.

Ankush Dhavre

भारतात सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२४ स्पर्धेचा थरार सुरु आहे. या स्पर्धेत युवा खेळाडू आपला जलवा दाखवताना दिसून येत आहेत. यासह संघातील अनुभवी खेळाडू देखील संघात कमबॅक करण्यासाठी जोर लावताना दिसून येत आहेत. दरम्यान गोलंदाजीत फलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरणाऱ्या मोहम्मद शमीने फलंदाजीत राडा केला आहे.

या स्पर्धेतील प्री क्वार्टर फायनलचा सामना बंगाल आणि चंडीगड या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात चंडीगड संघाने नाणेफेक जिंकून बंगालला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं. या सामन्यात बंगालला हवी तशी सुरुवात करता आली नव्हती. मात्र शमीने संघाला दमदार शेवट करुन दिला.

शेवटी गोलंदाजांना चोपलं

मोहम्मद शमी १० व्या क्रमांकावर फलंदाजीला आला. शमी पावरफुल फटके मारण्यासाठी ओळखला जातो. या सामन्यातही त्याची पावर हिटींग पाहायला मिळाली. त्याने या सामन्यात फलंदाजी करताना १७ चेंडूंचा सामना करत १८८.२४ च्या स्ट्राईक रेटने ३२ धावांची खेळी केली.

या खेळीदरम्यान त्याने ३ चौकार आणि २ षटकार खेचले. शमीने शेवटच्या षटकात संदीप शर्माला चांगलंच चोपलं. या षटकात त्याने २ षटकार आणि १ चौकार मारला. यासह त्याने शेवटच्या षटकात १९ धावा कुटत संघाची धावसंख्या १५९ धावांवर पोहोचवली.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं, तर सलामीला फलंदाजी करताना करन लालने (३३) धावांची खेळी केली. तर शाकीर गांधीने (१०), ह्रित्विक चॅटर्जीने (२८), प्रदिप्ता प्रमाणिकाने (३०) आणि शमीने शेवटी (३२) धावांची खेळी करत संघाची धावसंख्या १५९ धावा केल्या. यासह चंडीगडला हा सामना जिंकण्यासाठी १६० धावांची गरज होती.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: काका चुकांवर पांघरुण घालायचे, दादांना शरद पवारांची आठवण का आली

आय लव्ह मोहम्मद आणि आय लव्ह महादेव; देशभरात रंगलेला बॅनर वाद आणि त्यामागची खरी कारणे

Maharashtra Politics : शिंदे गटाच्या नेत्याच्या मुलाला मारण्यासाठी ४ कोटींची सुपारी; पोलिसांत गुन्हा दाखल, राजकीय वर्तुळात खळबळ

Ladki Bahin Yojana: सरकारी लाडकीला दणका, 15 कोटी वसूल करणार

Belly Fat: पोटाची चरबी वाढलीये? फॉलो करा 'या' सोप्या टिप्स, पोटाचा घेर होईल कमी

SCROLL FOR NEXT