Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी कमबॅक केव्हा करणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट

Mohammed Shami News In Marathi: मोहम्मद शमीच्या कमबॅकबाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी कमबॅक केव्हा करणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट
mohammed shamitwitter
Published On

Mohammed Shami News In Marathi: भारतीय संघ सध्या बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका सुरु आहे. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारतीय संघाने बाजी मारली आहे. ही मालिका सुरु होण्यापूर्वी, मोहम्मद शमी या मालिकेतून कमबॅक करणार असल्याची चर्चा सुरु होती. मात्र त्याला या मालिकेसाठी भारतीय संघात स्थान दिलं गेलं नव्हतं.

शमीला भारतीय संघात कमबॅक करण्यासाठी काय करावं लागेल?

गेली काही महिने दुखापतीमुळे संघाबाहेर राहिल्यानंतर शमीला रणजी ट्रॉफीतून कमबॅक करण्याची संधी मिळाली होती. त्याने बंगालकडून रणजी ट्रॉफी स्पर्धेत कमबॅक केलं आणि पहिल्याच सामन्यात दमदार कामगिरी केली होती.

दरम्यान या कामगिरीनंतर त्याला भारतीय संघात स्थान देण्याची मागणी जोर धरु लागली होती. मात्र बीसीसीआयने त्याला, आणखी क्रिकेट खेळण्याचा सल्ला दिला.

Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी कमबॅक केव्हा करणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट
Ind vs Aus 2nd Test: टीम इंडियाला मोठा धक्का! स्टार फलंदाज दुसऱ्या कसोटीतून होऊ शकतो बाहेर

शमी पूर्णपणे फिट आहे की नाही,हे त्याची सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीतील कामगिरी पाहून ठरवलं जाणार आहे. शमीला वजन कमी करण्यावर भर देण्यासह आपल्या फिटनेसवर लक्ष केंद्रीत करावं लागणार आहे.

जर त्याने आपल्या फिटनेसवर पूर्णपणे लक्ष दिलं आणि फिटनेस टेस्ट यशस्वीरीत्या पूर्ण केली. तर तो ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळताना दिसून येऊ शकतो. या मालिकेतील तिसऱ्या सामन्याला १४ डिंसेबरपासून सुरुवात होणार आहे.

Mohammed Shami Comeback: मोहम्मद शमी कमबॅक केव्हा करणार? समोर आली सर्वात मोठी अपडेट
IND vs AUS 1st Test: भारताचा पर्थमध्ये एकतर्फी विजय! बुमराह, जयस्वालसह हे खेळाडू ठरले विजयाचे शिल्पकार

शमीला संघात स्थान देण्यासाठी बीसीसीआय कुठलाही धोका पतकारणार नाहीये. कारण ऑस्ट्रेलियाविरुद्धची कसोटी मालिका झाल्यानंतर भारतीय संघ चॅम्पियनन्स ट्रॉफी खेळण्यासाठी मैदानात उतरणार आहे. या स्पर्धेच्या दृष्टीने मोहम्मद शमी महत्वाचा गोलंदाज असणार आहे. आता शमीला केव्हा संधी मिळणार, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com