मोहम्मद शमी Saam tv
क्रीडा

Mohammed Shami Interview : ३ सामन्यांत १३ विकेट, अजून काय हवं?; संघाबाहेर केल्यानंतर मोहम्मद शमीनं व्यक्त केलं दुःख

Nandkumar Joshi

भारतीय क्रिकेट संघाचा तेजतर्रार आणि तितकाच यशस्वी गोलंदाज मोहम्मद शमीनं त्याच्या मनातली एक सल बोलून दाखवली आहे. २०१९ मधील वनडे वर्ल्डकपच्या सेमिफायनलध्ये टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमधून त्याला वगळलं होतं. संघ व्यवस्थापनाच्या या निर्णयावर प्रश्नही उपस्थित करण्यात आले होते. आता त्यावर स्वतः शमीनं प्रश्न उपस्थित केला आहे. ३ सामन्यांत १३ विकेट घेतल्या होत्या. माझ्याकडून तुम्हाला अजून काय अपेक्षित आहे, असा सवालही त्यानं केलाय.

मोहम्मद शमीनं २०१९ वनडे वर्ल्डकपमध्ये जबरदस्त कामगिरी केली होती. मात्र, त्याला सेमिफायनलमध्ये संधी मिळाली नाही. या निर्णयावर बरीच टीका झाली होती. शमीनं त्यावेळी ४ सामन्यांत १४ विकेट घेतल्या होत्या. अफगाणिस्तानविरुद्ध हॅट्ट्रिकही घेतली होती. इंग्लंडविरुद्ध पाच विकेट घेतल्या होत्या.

शमीला भारताच्या ग्रुप स्टेजमधील अखेरच्या सामन्यात संधी दिली नव्हती. तो सामना श्रीलंकेविरुद्ध झाला होता. सेमिफायनलला शमी पुन्हा मैदानात येईल असंच सगळ्यांना वाटलं होतं. पण त्याला बाहेरच ठेवलं. न्यूझीलंडनं मॅन्चेस्टरमध्ये झालेल्या सेमिफायनलच्या सामन्यात भारताला १८ धावांनी पराभूत केलं होतं.

याबाबत शुभंकर मिश्राच्या युट्यूब शोमध्ये शमीनं भाष्य केलं आहे. २०१९ मध्ये मी सुरुवातीचे सामने खेळलो नव्हतो. पण पुढच्या सामन्यात संधी मिळाली आणि मी हॅट्ट्रिक घेतली. पाच गडीही बाद केले. पुढच्याच सामन्यात ४ विकेट घेतल्या. २०२३ मध्येही तसंच काहीसं झालं. सुरुवातीचे सामने खेळलो नव्हतो. पण पुढच्याच सामन्यात पाच विकेट घेतल्या. त्यानंतर ४ विकेट आणि त्यानंतर पाच विकेट घेतल्या, अशी आठवण शमीने करून दिली.

यावेळी शमीनं त्याला नेहमीच खटकणाऱ्या एका गोष्टीवर बोट ठेवलं. मला नेहमी एकच गोष्टीचं आश्चर्य वाटतं. सर्व संघांना चांगली कामगिरी करणाऱ्या खेळाडूची गरज असते. मी तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या. माझ्याकडून तुम्हाला अजून काय हवं आहे. याचं माझ्याकडे उत्तर देखील नाही, अशी खंतही त्यानं बोलून दाखवली.

मला जेव्हा संधी मिळेल तेव्हा स्वतःला सिद्ध करू शकतो. तुम्ही मला संधी दिली आणि मी तीन सामन्यांत १३ विकेट घेतल्या. त्यानंतर न्यूझीलंडविरुद्ध आम्ही पराभूत झालो. एकूण चार सामने खेळलो. त्यात १४ विकेट घेतल्या. २०२३ मध्येही मी सात सामन्यांत २४ विकेट घेतल्या, असंही त्यानं सांगितलं.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'Navra Maza Navsacha 2' ची पाचव्या आठवड्यातही बक्कळ कमाई; बॉक्स ऑफिसवर ठरला ब्लॉकबस्टर चित्रपट

Rohit sharma: होय..माझा 'तो' निर्णय चुकला! रोहित शर्माने का मागितली माफी?

Bus Accident : घाट रस्त्यात बसचा अपघात; विद्यार्थ्यांसह ४० प्रवाशी जखमी

Maharashtra Politics: पुणे, सोलापूर ते लातूर, संगमनेर; काँग्रेसची उमेदवारी यादी रवींद्र धंगेकरांनी टाकली अन् डिलीट केली

Maharashtra News Live Updates: पपई पिकावर मोझॅक रोगाच्या प्रादुर्भाव, शेतकरी हवालदिल

SCROLL FOR NEXT