Mohammed Shami Saam Tv
Sports

Mohammed Shami : लाज वाटत नाही का, नमाज सोडून रंग उधळतेय? होळी साजरी केल्याने मोहम्मद शमीची लेक ट्रोल

Mohammed Shami Daughter : मोहम्मद शमीची लेक आयरा सोशल मीडियावर ट्रोल होत आहे. आयराच्या आईने तिचे होळी खेळतानाचे फोटो पोस्ट केले होते. या फोटोवर कमेंट करत काहीजण आयराला ट्रोल करत असल्याचे पाहायला मिळत आहे.

Yash Shirke

Holi 2025 : होळीचा सण आज देशभरात साजरा केला जात आहे. सर्वसामान्यांपासून ते सेलिब्रिटींनी रंग खेळल्याचे पाहायला मिळत आहे. टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या लेकीने आयराने देखील रंगांनी होळी खेळली. शमीच्या पूर्वश्रमीची पत्नी हसीन जहाने शमीच्या लेकीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केले. या फोटोवरुन शमी आणि त्याची लेक ट्रोल होत आहेत.

मोहम्मद शमी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये खेळला होता. भारताच्या विजयामध्ये त्याचा मोलाचा वाटा होता. चॅम्पियन्स ट्रॉफीच्या कालावधीमध्ये रमजान महिन्याला सुरुवात झाली होती. तेव्हा खेळावर परिणाम होऊ नये यासाठी शमीने रमजानमध्ये रोजा म्हणजेच उपवास न ठेवण्याचा निर्णय घेतला होता.

सामन्यादरम्यान मोहम्मद शमीचे फोटो व्हायरल झाले होते. रमजानमध्ये रोजा न ठेवल्याने काहीजणांनी शमीवर टीका केली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा शमी ट्रोलर्सच्या निशाण्यावर असल्याचे म्हटले जात आहे. शमीच्या लेकीने, आयराने होळी खेळल्याने काही यूजर्स नाराज झाले आहेत. अनेकांनी तिच्या फोटोखाली कमेंट्स करत विरोध दर्शवला आहे.

मुसलमान असूनही होळी खेळल्याने शमीची लेक ट्रोल झाली आहे. याआधीही काहींनी एका डान्स व्हिडीओवरुन तिला ट्रोल केले होते. रमजानच्या पवित्र महिन्यात होळीच्या गाण्यांवर नाचतेस असे म्हणत काहीजणांनी नाराजी व्यक्त केली होती. या व्हिडीओवरुन शमीची पूर्वश्रमीची पत्नी हसीन जहावरही लोक भडकले होते.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune News : आजारी आजीला तरुणाने पाठीवर बसवून रुग्णालयात नेलं, ५ किमीपर्यंत पायपीट; पुणे जिल्ह्यातलं भयंकर वास्तव

Heart Disease: धक्कादायक! भारतातील ४ पैकी एका व्‍यक्‍तीला अनुवांशिक घटकांच्या जोखीमेमुळे हृदयाच्या आजारांचा धोका

Maharashtra Live News Update: केळी पीक विम्याच्या लाभातील प्रशासकीय अडथळा अखेर दूर

Box Office: 'जॉली एलएलबी ३' आणि दशावतारमध्ये काटे की टक्कर; कोणी मारली बाजी तिकिट खिडकीवर बाजी?

भय इथले संपले नाही! सोलापूर अन् धाराशिवमध्ये पावसाचा जोर कायम; पुढील २४ तास धोक्याचे

SCROLL FOR NEXT