Mohammed Shami Saam Tv
Sports

World cup IND vs NZ: मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्याने इतिहास रचला; सर्वाधिक बळी घेत मोडला मिचेल स्टार्कचा विक्रम

Mohammed Shami : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये एक मोठा विक्रम केलाय.

Bharat Jadhav

World cup IND vs NZ Mohammed Shami Record :

भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्ड कपमध्ये एक मोठा विक्रम केलाय. मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य फेरीत धोकादायक गोलंदाजी करत चार बळी घेतले. यादरम्यान शमीने वर्ल्डकपमध्ये ५० बळीही पूर्ण केले.(Latest News)

स्टार्कचा विक्रम मोडला

वर्ल्डकपच्या इतिहासात ५० बळी घेणारा तो पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. याशिवाय शमीने ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्कचा विक्रमही मोडला. मोहम्मद शमीने वर्ल्डकपमध्ये ७९५ चेंडू टाकून ५० विकेट घेतल्या. शमी सर्वात कमी चेंडूत ५० बळी घेणारा गोलंदाज ठरलाय. या बाबतीत मिचेल स्टार्कचा विक्रम शमीने मोडला. स्टार्कने ९४१ चेंडूत ५०विकेट घेतल्या. यासाठी लसिथ मलिंगाने ११८७ 7 चेंडू, ग्लेन मॅकग्राने १५४० चेंडू आणि ट्रेंट बोल्टने १५४३ चेंडू टाकले.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे गोलंदाज

  • ग्लेन मॅक्ग्रा -७१ ऑस्ट्रेलिया

  • मुथैया मुरलीधरन-६८ श्रीलंका

  • मिचेल स्टार्क-५९ ऑस्ट्रेलिया

  • लसिथ मलिंगा-५६ श्रीलंका

  • वसीम अकरम-५५ पाकिस्तान

  • ट्रेंट बोल्ट-५३ न्यूझीलंड

  • मोहम्मद शमी-५१ भारत

मोहम्मद शमीने केवळ १७ डावात ५० विकेट घेतल्या. वर्ल्डकपच्या सर्वात कमी डावात ५० बळी घेणारा तो पहिला गोलंदाज ठरलाय. या बाबतीतही त्याने मिचेल स्टार्कला मागे टाकले. स्टार्कने १९ डावात ५० विकेट घेतल्या होत्या. लसिथ मलिंगाने २५ ट्रेंट बोल्टने २८ आणि ग्लेन मॅकग्राने ३० डावात ५० विकेट घेतल्या आहेत.

सेमिफायनलमध्ये टीम इंडिया आणि न्यूझीलंडमध्ये हाय व्हॉल्टेज सामना झाला. अतितटीच्या सामन्यात मोहम्मद शमीच्या भेदक माऱ्यापुढे न्यूझीलंड फलंदाजांनी नांगी टाकलेली दिसली. सुरुवातील न्युझीलंडच्या फलंगदाजांनी भारतीय गोलंदाजांची जोरात धुलाई केली. त्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या चेंडूत आग ओकत न्यूझीलंडचे सात गडी बाद केले. शमीने सात गडी बाद करून भारताच्या संघाला अंतिम सामन्यात नेलं आहे. वर्ल्ड कपच्या इतिहासात एका सामन्यात ७ गडी बाद करणारा मोहम्मद शमी पहिला गोलंदाज ठरलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: सिगारेट, पैशांच्या बॅगा आणि मंत्री शिरसाट; संजय राऊतांचा व्हिडीओ पोस्ट करत मोठा गौप्यस्फोट

मराठी-हिंदी वादात ब्रिजभूषण सिंहांची उडी,ठाकरेंना थेट धमकी

गौरवास्पद! UNESCO च्या यादीत पुण्यातील तीन किल्ल्यांचा समावेश | VIDEO

Government Scheme : मुलांसाठी सरकारची नवी योजना? मुलांना महिन्याला 3 हजार?

Sleeping Vastu Tips: वास्तुशास्त्रानुसार झोपण्याची योग्य दिशा कोणती?

SCROLL FOR NEXT