World Cup 2023: मोहम्मद शमीने कोणासाठी केलं ते सेलिब्रेशन? सामन्यानंतर स्वत: केला मोठा खुलासा

Mohammed Shami Celebration: हा सामना झाल्यानंतर मोहम्मद शमीने आपल्या सेलिब्रेशनबाबत मोठा खुलासा केला आहे.
mohammed shami
mohammed shamitwitter
Published On

Mohammed Shami Celebration:

भारतीय संघातील वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेत कहर केला आहे. श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात त्याने अवघ्या १८ धावा खर्च करत ५ गडी बाद केले आहेत. यासह तो भारतीय संघासाठी वर्ल्डकप स्पर्धेत सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या सामन्यात पाचवा गडी बाद करताच त्याने खास सेलिब्रेशन केलं. हे सेलिब्रेशन करण्यामागचं कारण काय? याबाबत शमीने खुलासा केला आहे. (Mohammed Shami Celebration)

या सामन्यात मोहम्मद शमीच्या नावे आणखी एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे. तो भारतीय संघासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळेस ५ गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे.

या बाबतीत त्याने ५ हरभजन सिंगला मागे सोडलं आहे. हरभजनने आतापर्यंत ३ वेळेस हा कारनामा केला होता. तर मोहम्मद शमीने चौथ्यांदा हा कारनामा केला आहे. दरम्यान पाचवा फलंदाज बाद केल्यानंतर त्याने ड्रेसिंग रुमकडे पाहून इशारा केला .

हा इशारा पाहून काही लोकांचं म्हणणं होतं की, शमीने हा इशारा हरभजन सिंगसाठी केला. तर काही लोकांचं म्हणणं आहे की, हा इशारा त्याने बॉलिंग कोचसाठी केला आहे. दरम्यान हा सामना झाल्यानंतर शमीने खुलासा करत सांगितलं की, हा इशारा त्याने बॉलिंग कोच पारस म्हांब्रे यांच्यासाठी केला होता. शुभमन गिलने देखील याबाबत खुलासा करत म्हटले की, हा इशारा त्याने बॉलिंग कोच पारस म्हांब्रेसाठी केला. कारण त्यांच्या डोक्यावर एकही केस नाही. (Latest sports updates)

mohammed shami
Viral Video: 'कोहली को बॉलिंग दो..'LIVE सामन्यात फॅन्सची मागणी! विराटच्या खास अंदाजाने जिंकले मन,Video

भारतीय संघाचा सेमीफायनलमध्ये प्रवेश...

या सामन्यात विजय मिळवत भारतीय संघाने वर्ल्डकप २०२३ स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाने आतापर्यंत ७ सामने खेळले आहेत. हे ७ सामने जिंकून १४ गुणांसह भारतीय संघ गुणतालिकेत अव्वल स्थानी विराजमान आहे.

तर दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या स्थानी आहे. भारतीय संघ पुढील सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन हात करताना दिसून येणार आहे. हा सामना कोलकाताच्या ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे.

mohammed shami
World Cup Points Table: भारत - पाकिस्तानात होणार WC ची सेमीफायनल! टीम इंडियाच्या विजयानंतर पॉइंट्स टेबलचं समीकरण बदललं..

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com