IND VS AUS Saam Tv
क्रीडा

IND VS AUS:शमी ऑन फायर! वॉर्नरची दांडी गुल करताच मोहम्मद शमीच्या नावे झाली 'या' मोठ्या विक्रमाची नोंद

डेव्हिड वॉर्नरला बाद करताच मोहम्मद शमीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

Saam TV News

IND VS AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया (India vs Australia) यांच्यातील ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. या सामन्यात नाणेफेक गमावून प्रथम गोलंदाजी करत असलेल्या भारतीय संघाला वेगवान गोलंदाजांनी चांगली सुरुवात करून दिली आहे. दरम्यान डेव्हिड वॉर्नरला बाद करताच मोहम्मद शमीच्या नावे एका मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.

डेव्हिड वॉर्नरची दांडी गुल करताच, मोहम्मद शमीच्या नावे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ४०० गडी बाद करण्याची नोंद झाली आहे. असा पराक्रम करणारा तो ९ वा भारतीय गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी अनिल कुंबळे, हरभजन सिंग, कपिल देव, आर अश्विन, जहीर खान, जवागल श्रीनाथ, रवींद्र जडेजा आणि ईशांत शर्मा यांनी हा पराक्रम केला आहे. (Latest Sports Update)

भारतीय संघासाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज..

अनिल कुंबळे- ९५३

हरभजन सिंग - ७०७

कपिल देव-६८७

आर अश्विन -६७२

जहीर खान - ५९७

जवागल श्रीनाथ -५५१

रवींद्र जडेजा -४८२

ईशांत शर्मा -४३२

मोहम्मद शमी- ४००*

वॉर्नरला बोल्ड करत दाखवला पॅव्हेलियनचा रस्ता..

मोहम्मद शमीच्या पहिल्या षटकात डेव्हिड वॉर्नरने ४ चेंडूंचा सामना केला होता. मात्र पुढील षटकातील पहिल्याच चेंडूवर मोहम्मद शमीचा चेंडू टप्पा पडून आत आला जो डेव्हिड वॉर्नरने डिफेन्स करण्याचा प्रयत्न केला. मात्र बॅट चेंडूवर येणार इतक्यात चेंडू यष्टीला जाऊन धडकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amit Thackeray: 'हा कोणा राजपुत्राचा पराभव नसून..', निकालानंतर अमित ठाकरेंची भावनेला हात घालणारी प्रतिक्रिया

Maharashtra Assembly Election Result : मुंबई कुणाची? ठाकरे, भाजप, शिंदे कुणाचा कोणत्या मतदारसंघात उमेदवार विजयी?

Broccoli Dishes: हिवाळ्यात सुपरफुड पेक्षा कमी नाही 'ब्रोकोली', आहारात समावेश करून पाहा

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results: कर्जत-जामखेडमधून रोहित पवार विजयी

Ajaz Khan : सोशल मीडियावर हवा; मात्र राजकारणात डब्बागुल,'बिग बॉस' फेम अभिनेत्याचा दारूण पराभव

SCROLL FOR NEXT