IND VS AUS: दांडी गुल्ल!पहिल्याच चेंडूवर वॉर्नर क्लीन बोल्ड,स्टंप उडून पडला ५ फूट लांब -VIDEO

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफी २०२३ ला जोरदार सुरुवात झाली आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे.
IND VS AUS
IND VS AUSSaam tv
Published On

IND VS AUS: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफी (Border-Gavaskar Trophy) २०२३ ला जोरदार सुरुवात झाली आहे. ४ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला कसोटी सामना हा नागपूरच्या विदर्भ क्रिकेट असोसिएशनच्या मैदानावर सुरु आहे. या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलिया संघाला भारतीय संघातील गोलंदाजांनी सुरुवातीलाच मोठा धक्का दिला आहे.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचा हा निर्णय पूर्णपणे फसल्याचे दिसून आले आहे. सुरवीवातीलाच भारतीय वेगवान गोलंदाजानी विकेट्स घेत भारताला चांगली सुरुवात करून दिली आहे. दरम्यान मोहम्मद शमीने (Mohammed Shami) डेव्हिड वॉर्नरला क्लीन बोल्ड केल्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

IND VS AUS
IND VS AUS: पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकत फलंदाजी करण्याचा निर्णय, अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११

तर झाले असे की, पहिल्या डावातील तिसरे षटक टाकण्यासाठी मोहम्मद शमी गोलदांजीला आला होता. या षटकातील पहिलाच चेंडू टप्पा पडून भन्नाट वेगाने अँगल बनवून इतका आत आला की, डेव्हिड वॉर्नरला काही कळायच्या आत यष्टी उडुन दूर जाऊन पडली.

नागपूरची खेळपट्टी पाहता ऑस्ट्रेलियाचे फलंदाज फिरकी गोलंदाजांविरुद्ध खेळण्यासाठी जोरदार सराव करून आले होते. मात्र भारतीय वेगवान गोलंदाजांनी त्यांना अप्रतिम गोलंदाजी करत आश्चर्याचा धक्का दिला आहे.

IND VS AUS
Ind vs Aus 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून भिडणार, टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे भारतीय संघाची प्लेइंग ११ : केएल राहुल, रोहित शर्मा (कर्णधार), चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव ,रविंद्र जडेजा, केएस भरत,आर अश्विन, अक्षर पटेल, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

पहिल्या कसोटी सामन्यासाठी अशी आहे ऑस्ट्रेलिया संघाची प्लेइंग ११:डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ, मॅट रेनशॉ,पीटर हॅंड्सकॉम्ब, ॲलेक्स कॅरी,पॅट कमिन्स, टॉड मुरपी, नॅथन लायन, स्कॉट बोलँड.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com