Ind vs Aus 1st Test: भारत-ऑस्ट्रेलिया आजपासून भिडणार, टीम इंडिया इतिहास रचण्यासाठी सज्ज

आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी रँकिंगच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.
IND VS AUS
IND VS AUSBCCI Twitter
Published On

Ind vs Aus 1st Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेला आज म्हणजे 9 फेब्रुवारीपासून सुरुवात होत आहे. चार सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना आजपासून सुरु होत आहे. आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि आयसीसी रँकिंगच्या दृष्टीने टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची आहे.

रोहित शर्माकडे कर्णधार तर केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी आहे. कसोटी मालिकेत टीम इंडिया गेल्या काही वर्षांपासून ऑस्ट्रेलियाविरुद्ध वर्चस्व गाजवत आहे. ऑस्ट्रेलियन संघाने टीम इंडियाविरुद्ध 2014 साली शेवटची कसोटी मालिका जिंकली होती.  (Latest Marathi News)

IND VS AUS
ICC T20 Ranking : टी-२० क्रमवारीत शुभमन गिलची मोठी झेप; पांड्यानेही मारली उडी, कोण कुठल्या स्थानावर? वाचा...

2014 पासून, तीन कसोटी मालिका झाल्या आहेत, ज्यामध्ये भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे. अशा स्थितीत पुन्हा एकदा भारतीय संघ ही मालिका जिंकून इतिहास रचण्याच्या इराद्याने मैदानात उतरणार आहे. 2020-21 मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारतीय संघाने कसोटी मालिका 2-1 ने जिंकली होती.

एकूण कसोटी रेकॉर्डमध्ये ऑस्ट्रेलियन संघ भारताविरुद्ध वरचढ असल्याचे दिसते. दोन्ही संघांमध्ये आतापर्यंत एकूण 102 कसोटी सामने झाले आहेत, ज्यामध्ये ऑस्ट्रेलियाने 43 जिंकले आहेत, भारतीय संघाने 30 कसोटी सामन्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचा पराभव केला आहे, तर 28 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. (Cricket News

नागपूर कसोटीसाठी दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग इलेव्हन

भारत : रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल/शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, शुभमन गिल/सूर्यकुमार यादव, केएस भरत (विकेटकीपर), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल/कुलदीप यादव, मोहम्मद शमी आणि मोहम्मद सिराज.

ऑस्ट्रेलिया : डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्ह स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, पीटर हँड्सकॉम्ब, अॅलेक्स कॅरी (विकेटकीपर), पॅट कमिन्स, अॅश्टन अगर/टॉड मर्फी, नॅथन लियॉन आणि स्कॉट बोलँड.

IND VS AUS
IND VS AUS Test: पहिल्या कसोटीत पडणार विक्रमांचा पाऊस! विराट होणार २५ हजारी तर स्मिथ सचिनला सोडू शकतो मागे

ऑस्ट्रेलियाचा भारत

>> पहिली कसोटी - 9 फेब्रुवारी ते 13 फेब्रुवारी (नागपूर)

>> दुसरी कसोटी - 17 ते 21 फेब्रुवारी (दिल्ली)

>> तिसरी कसोटी - 1 ते 5 मार्च (धर्मशाला)

>> चौथी कसोटी - 9 ते 13 मार्च (अहमदाबाद)

>> पहिली वनडे - 17 मार्च (मुंबई)

>> दुसरी वनडे - 19 मार्च (विशाखापट्टणम)

>> तिसरी एकदिवसीय - 22 मार्च (चेन्नई)

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com