ICC T20 Ranking : टी-२० क्रमवारीत शुभमन गिलची मोठी झेप; पांड्यानेही मारली उडी, कोण कुठल्या स्थानावर? वाचा...

क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे.
ICC T20 Ranking Latest
ICC T20 Ranking LatestSaam TV

ICC Latest T20 Ranking : भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातील नुकत्याच पार पडलेल्या टी-२० मालिकेनंतर आयसीसीने टी-२० क्रिकेट क्रमवारी जाहीर केली आहे. या क्रमवारीत टीम इंडियाचा युवा सलामीवर फलंदाज शुभमन गिलने मोठी झेप घेतली आहे. गिलने तब्बल १६८ स्थानांनी उडी घेऊन क्रमवारीत मोठा उलटफेर केला आहे. क्रिकेटच्या कारकिर्दीतील त्याची ही बेस्ट रँकिंग ठरली आहे. (Latest Marathi News)

ICC T20 Ranking Latest
Rohit Sharma : रोहित शर्माचा टी-२० संघातून पत्ता कट? दिग्गज खेळाडूचं मोठं विधान, म्हणाला विश्वचषकातही..,

आयसीसीने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार टीम इंडियाचा (Team India) मिस्टर ३६० अर्थात सूर्यकुमार यादव हा फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थानावर कायम आहे. सूर्यकुमारच्या खात्यात एकूण ९०६ गुण जमा आहेत. न्यूझीलंडविरुद्ध तिसऱ्या आणि शेवटच्या टी-२० सामन्यांत धडकेबाज फलंदाजी करणाऱ्या शुभमन गिलला सुद्धा मोठं गिफ्ट मिळालं असून त्याने तब्बल १६८ धावांची झेप घेतली आहे. (Cricket News

आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या तीनही फॉर्मेटमध्ये शतक ठोकण्याचा विक्रम करणारा शुभमन गिल हा वनडे क्रमवारीत सहाव्या तर टेस्ट क्रमवारीत ६२ व्या स्थानावर आहे. आता तर त्याने टी-२० क्रमवारीतही मोठी झेप घेतली असून तो तिसाव्या क्रमांकावर पोहचला आहे. (Sport News) न्यूझीलंडविरुद्धच्या टी-२० मालिकेपूर्वी शुभमन हा क्रमवारीत पहिल्या शंभरमध्ये सुद्धा नव्हता. मात्र, शेवटच्या सामन्यात त्याने दमदार शतकी खेळी केल्याने तो थेट तिसाव्या स्थानावर पोहचला आहे.

ICC T20 Ranking Latest
IND VS AUS: 'सूर्या'चे होणार पदार्पण तर 'या' २ खेळाडूंचा होणार पत्ता कट,पाहा कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

हार्दिक पांड्याचीही उडी

आयसीसीच्या टी-२० क्रमवारीत टीम इंडियाचा नवा कर्णधार हार्दिक पांड्याने सुद्धा मोठी उडी घेतली. पांड्याने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या स्थानावर विराजमान झाला आहे. हार्दिकच्या खात्यात २५० गुण जमा झाले आहे. अजूनही पहिल्या स्थानावर बांग्लादेशचा ऑलराऊंडर शाकिब अल हसन विराजमान आहे.

शकिबच्या नावावर २५२ गुण आहेत. दुसरीकडे टीम इंडियाचा युवा गोलंदाज अर्शदीप सिंहने गोलंदाजाच्या यादीत १३ वा क्रमांक पटकावला आहे. विशेष बाब म्हणजे गोलंदाजांच्या टॉप १० यादीत एकही भारतीय नाही. फलंदाजांबाबत सांगायचं झाल्यास, विराट कोहलीला एका अंकाचं नुकसान सहन करावं लागलं असून त्याची १५ व्या स्थानावर घसरण झाली. तर के एल राहुल २७ आणि कर्णधार रोहित शर्मा २९ व्या स्थानावर कायम आहे. इशात किशनच्या रेटिंग पॉईंटमध्येही घसरण झाली असून तो ४८ व्या स्थानावर फेकला गेला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com