IND VS AUS Test: पहिल्या कसोटीत पडणार विक्रमांचा पाऊस! विराट होणार २५ हजारी तर स्मिथ सचिनला सोडू शकतो मागे

दोन्ही संघातील खेळाडूंकडे काही खास विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.
Ind vs Aus Test
Ind vs Aus Test saam tv

IND VS AUS Test Updates : भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात होणारी बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी सुरु व्हायला अवघे काही तास शिल्लक राहिले आहेत. दोन्ही संघांनी या मालिकेसाठी जोरदार तयारी केली आहे. तसेच या मालिकेत काही स्टार खेळाडूंमध्ये अटीतटीची लढत पाहायला मिळू शकते. दोन्ही संघातील खेळाडूंकडे काही खास विक्रम मोडण्याची संधी असणार आहे.

विराटकडे २५ हजार धावा पूर्ण करण्याची संधी.

भारतीय संघाचा माजी कर्णधार विराट कोहलीला गेल्या काही वर्षांपासून कसोटी क्रिकेटमध्ये शतक झळकावता आले नाहीये.त्यामुळे तो या कसोटी मालिकेत शतक झळकावण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

तसेच विराटला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये २५ हजार धावा पूर्ण करण्यासाठी केवळ ६४ धावांची आवश्यकता आहे. त्याने आतापर्यंत ४९० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये २४९३६ धावा केल्या आहेत. सचिन तेंडुलकर हा एकमेव फलंदाज आहे, ज्याने २५ हजार धावांचा पल्ला गाठला आहे. (Team India)

Ind vs Aus Test
IND vs AUS: टीम इंडियासाठी बॉर्डर-गावसकर मालिका असेल खास, मोठे विक्रम होणार? कोहली, रोहित लिस्टमध्ये सामील

सर्वात जलद ४५० विकेट्स..

भारतीय संघातील अनुभवी गोलंदाज आर अश्विनकडे सर्वात जलद ४५० विकेट्स घेण्याचा विक्रम आपल्या नावावर करण्याची नामी संधी असणार आहे. केवळ १ गडी बाद करताच तो सर्वात जलद ४५० विकेट्स घेणारा भारतीय गोलंदाज बनेल. (Latest Sports Update)

स्मिथकडे सचिनचा विक्रम मोडण्याची संधी..

ऑस्ट्रेलियन फलंदाज स्टीव्ह स्मिथकडे मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा विक्रम मोडून काढण्याची संधी असणार आहे.

स्मिथने बॉर्डर गावसकर ट्रॉफीमध्ये आतापर्यंत १४ सामन्यांमध्ये ८ शतके झळकावली आहेत. तर सचिनने ३४ कसोटी सामन्यांमध्ये ९ शतक झळकावले होते. केवळ २ शतक झळकावताच स्टीव्ह स्मिथ सचिन तेंडुलकरला मागे सोडू शकतो.

Ind vs Aus Test
IND VS AUS: 'सूर्या'चे होणार पदार्पण तर 'या' २ खेळाडूंचा होणार पत्ता कट,पाहा कशी असेल टीम इंडियाची प्लेइंग ११

पुजारा पूर्ण करणार २ हजार धावा..

भारतीय फलंदाज चेतेश्वर पुजाराने ऑस्ट्रेलिया विरुद्ध झालेल्या २० सामन्यांमध्ये १८९३ धावा केल्या आहेत. केवळ १०७ धावा करताच तो ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध २००० धावा पूर्ण करेल. असा पराक्रम करणारा तो चौथा भारतीय फलंदाज ठरेल.

नॅथन लायनकडे मोठा विक्रम करण्याची संधी ..

ऑस्ट्रेलियाचा दिग्गज फिरकीपटू नॅथन लायनने २२ कसोटी सामन्यांमध्ये ९४ गडी बाद केले आहेत. नागपूर कसोटीत केवळ ६ गडी बाद करताच तो भारतीय संघाविरुद्ध १०० गडी बाद करणारा तिसरा गोलंदाज ठरेल. तर बॉर्डर गावसकर ट्रॉफीत १०० गडी बाद करणारा तो अनिल कुंबळे नंतर दुसराच गोलंदाज ठरेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com