IND vs AUS: टीम इंडियासाठी बॉर्डर-गावसकर मालिका असेल खास, मोठे विक्रम होणार? कोहली, रोहित लिस्टमध्ये सामील

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताच्या नावावर होऊ शकतील असे काही खास विक्रम जाणून घेऊया.
India
IndiaSaam TV

IND vs AUS: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात उद्या 9 फेब्रुवारीपासून बॉर्डर-गावसकर ट्रॉफीला सुरुवात होणार आहे. त्याचा पहिला सामना नागपूर येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशनमध्ये होणार आहे. चार कसोटी सामन्यांची ही मालिका असणार आहे.

या मालिकेत भारतीय संघ (Team India) आणि काही खेळाडू खास विक्रम आपल्या नावावर करू शकतात. त्यात विराट कोहलीच्या 25,000 आंतरराष्ट्रीय धावा करण्याच्या विक्रमाचाही समावेश आहे. बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये भारताच्या नावावर होऊ शकतील असे काही खास विक्रम जाणून घेऊया. (Sports latest updates)

India
Border-Gavasakar Trophy: शुभमन गिल पहिल्या टेस्टमधून बाहेर? केएल राहुलने प्लेइंग ११ बाबत दिली मोठी अपडेट

टीम इंडिया नंबर-1 बनणार

भारतीय संघ ही मालिका जिंकून आयसीसी कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवू शकतो. सध्या टीम इंडिया क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आहे, तर ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ही मालिका जिंकून भारतीय संघ तिन्ही फॉरमॅटमध्ये नंबर वन बनू शकतो. वनडे आणि टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये संघ पहिल्या क्रमांकावर आहे.

विराट कोहलीचा सरासरीबाबत विक्रम

मालिका जिंकून भारतीय संघ जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश करेल. या मालिकेत चमकदार कामगिरी करून विराट कोहली पुन्हा एकदा तिन्ही फॉरमॅटमध्ये ५० पेक्षा जास्त सरासरी करू शकतो. सध्या त्याची कसोटीतील फलंदाजीची सरासरी ४८.९१ आहे. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 57.7 आणि टी-20 आंतरराष्ट्रीयमध्ये 52.74 आहे.

यंदाच्या बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये शतक झळकावणारा रोहित शर्मा कर्णधार म्हणून तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकावण्याचा विक्रम करु शकतो. कर्णधार म्हणून रोहित शर्मा ऑस्ट्रेलियाविरुद्ध नागपुरात तिसरा कसोटी सामना खेळणार आहे. मागील दोन कसोटी सामन्यांमध्ये त्याने एकूण 90 धावा केल्या आहेत, ज्यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 46 आहे.

India
Team India: आनंद गगनात मावेना! Team India च्या सुपर लेडींचा भन्नाट डान्स; ICC ने शेअर केला Video

विराट 25000 धावा पूर्ण करणार?

बॉर्डर-गावसकर ट्रॉफीमध्ये अवघ्या 64 धावा करून विराट कोहली आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 25,000 धावा पूर्ण करू शकतो. कोहलीने आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 24936 धावा केल्या आहेत.

चेतेश्वर पुजारा 100 कसोटी सामने पूर्ण करणार?

भारतीय संघाचा स्टार फलंदाज चेतेश्वर पुजाराने आपल्या कारकिर्दीत आतापर्यंत एकूण 98 कसोटी सामने खेळले आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत तो दोन सामने खेळून आपले 100 कसोटी सामने पूर्ण करेल.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com