chris gayle
chris gayle instagram
क्रीडा | IPL

Complaint Filed On Chris Gayle: मैदान गाजवणारा ख्रिस गेल अडचणीत? मनसेचं थेट पोलिसांकडे तक्रारीचं पत्र, काय आहे प्रकरण?

Ankush Dhavre, सुरज सावंत

Chris Gayle: वेस्ट इंडिजचा आक्रमक फलंदाज ख्रिस गेल हा आपल्या विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आयपीएल आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटला राम राम केला आहे.

दरम्यान तो काही ना काही कारणामुळें चर्चेत येत असतो. आता तो क्रिकेटच्या कामगिरीमुळे नव्हे तर एका वेगळ्या कारणामुळे चर्चेत आला आहे.

ख्रिस गेल हा भारतात देखील प्रचंड प्रसिद्ध आहे. क्रिकेटमधून निवृत्त होऊनही त्याची ब्रँड व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. त्यामुळे तो जाहिरातींमध्ये झळकताना दिसून येत असतो. दरम्यान आता मुंबईत जाहिरातीचं शूट करणं त्याला महागात पडू शकतं.

मुंबईच्या समुद्रात गेलने जाहिरातीच चित्रिकरण हे बेकायदेशीर पद्धतीने केल्याचा आरोप मनसेने केला आहे. यावरून मनसेने गेलवर कारवाई करण्यासाठी पोलिसांना तक्रारीचं निवदेन धाडलं आहे

मनसेने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, ख्रिस गेल आणि संबंधितांनी कुठलीही परवानगी घेतली नव्हती. म्हणून ख्रिस गेलसह 'कमला पसंद इलायची' चे मालक आणि ज्या एजन्सीची ही जाहिरात बनवण्यासाठी नेमणूक करण्यात होती त्या एजन्सीची कठोर चौकशी करण्यात यावी. असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. (Latest sports updates)

तसेच पुढे त्यांनी लिहिले की, ज्या बोटीतून ख्रिस गेल आणि शुटिंग टीम समुद्रात गेले होते. त्या बोटीचा मालक आणि क्रू मेम्बर्सची देखील स्वतंत्र चौकशी व्हावी.

तसेच परवानगी नसताना या सर्वाना समुद्रात घेऊन जाणाऱ्या बोटीची/यॉटची नोंदणी रद्द करण्याची मागणी या निवेदनात करण्यात आली आहे. त्यांचं म्हणणं आहे की, महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डने स्वतःहून पुढाकार घेत ही कारवाई करायला हवी.

परवानगी न घेता केलं चित्रीकरण

देशातील आणि परदेशातील नागरिकांना मुंबईत आणि विशेषतः मुंबईच्या समुद्रात चित्रीकरण करताना परवानगी घेणं बंधनकारक आहे. मात्र निर्मितीचा खर्च वाचवण्यासाठी कुठलीही परवानगी घेतली गेली नाही.

मुंबई पोर्ट ट्रस्ट तसेच नौसेनेचा तळ या अतिमहत्वाच्या ठिकाणांबाबतच्या सुरक्षा व्यवस्थेवरही गंभीर प्रश्चचिन्ह उपस्थित झाले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Supreme Court: ...तर मानधन सोडा, घशाला आराम द्या; रोहतगींच्या त्या विनंतीवर CJI चंद्रचूड यांचं उत्तर

Pune Crime: कात्रज,स्वारगेट परिसरात दोन जणांचा खून; शिवीगाळ केल्याच्या वादातून एकाने डोक्यात घातला दगड

Maharashtra Drought: राज्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र; नद्या आटल्या, विहिरी कोरड्याठाक, हंडाभर पाण्यासाठी वणवण

Lok Sabha Election: तिसरा टप्पा BJP साठी महत्त्वाचा, 2019 मध्ये याच टप्प्यात मिळालं होतं मोठं यश; यंदा काय आहे राजकीय परिस्थिती?

MI vs SRH,IPL 2024: हैदराबादवर सूर्या कोपला! शतकी खेळीनं मुंबईच्या लल्लाटी विजयी 'तिलक', प्ले ऑफची समीकरणंच विस्कटली

SCROLL FOR NEXT