Mitchell Starc Record: वर्ल्डकपचा खरा 'किंग' मिचेल स्टार्क! मोठ्या रेकॉर्डमध्ये मलिंगाला मागे सोडत बनला नंबर 1
mitchell starc AFP
क्रीडा | T20 WC

Mitchell Starc Record: वर्ल्डकपचा खरा 'किंग' मिचेल स्टार्क! मोठ्या रेकॉर्डमध्ये मलिंगाला मागे सोडत बनला नंबर 1

Ankush Dhavre

वर्ल्डकपची जेव्हा चर्चा होते, तेव्हा मॉडर्न डे क्रिकेटमधील २ खेळाडूंची नावं आवर्जून घेतली जातात. हे २ खेळाडू म्हणजे भारताचा अनुभवी फलंदाज विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क. वर्ल्डकपमध्ये विराट कोहलीने धावांचा पाऊस पाडला आहे. तर दुसरीकडे मिचेल स्टार्कने विकेट्सचा पाऊस पाडला आहे. मिचेल स्टार्क हा वर्ल्डकप स्पर्धेतील खरा किंग ठरला आहे. बांगलादेशविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याने मोठ्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

सुपर ८ फेरीतील सामन्यात ऑस्ट्रेलिया आणि बांगलादेश हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात मिचेल स्टार्कने ४ षटकात २१ धावा खर्च करत १ गडी बाद केला. या १ गडी बाद करण्यासह तो टी-२० आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिळून सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. या रेकॉर्डमध्ये त्याने श्रीलंकेचा दिग्गज गोलंदाज लसिथ मलिंगाचा रेकॉर्ड मोडून काढला आहे.

लसिथ मलिंगाबद्दल बोलायचं झालं, तर त्याने टी-२० आणि वनडे वर्ल्डकप स्पर्धेत मिळून ६० सामने खेळले होते. यादरम्यान त्याने ९४ गडी बाद केले होते. दरम्यान मिचेल स्टार्कने आपल्या ५२ व्या सामन्यात ९५ गडी बाद करत हा रेकॉर्ड मोडून काढला आहे. त्याने वनडे वर्ल्डकप स्पर्धेत्या इतिहासात ६५ गडी बाद केले आहेत. तर टी-२० वर्ल्डकप स्पर्धेत त्याला ३० गडी बाद करता आले आहेत.

हे आहेत वर्ल्डकपमध्ये सर्वाधिक गडी बाद करणारे गोलंदाज

मिचेल स्टार्क ९५ (वनडे- ६५, टी-२० ३०)

लसिथ मलिंगा ९४ ( वनडे-५६, टी-२० -३८)

शाकिब अल हसन ९२ (वनडे ४३, टी-२० ४९)

ट्रेन्ट बोल्ट ८७ (वनडे ५३, टी-२० - ४९)

मुथय्या मुरलीधरन ७९ ( वनडे ६८, टी-२० ११)

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Horoscope Today : आज 'या' राशीच्या लोकांनी मोठी रिस्क घेणं टाळा; तुमच्या नशिबात बुधवारी काय? वाचा राशी भविष्य

Dombivli News: पूछता है डोंबिवलीकर! रस्त्याच्या कामाच्या दर्जावरून मनसे आमदार राजू पाटील आक्रमक

Team India: बार्बाडोसमध्ये अडकलेली टीम इंडिया आज येणार मायदेशी? का अडकले होते खेळाडू?

Rohit Sharma Barbados VIDEO: T20 चॅम्पियन झाल्यानंतर रोहितने पिचवरची माती का खाल्ली?

Amazon Prime Day 2024 सेल या दिवशी भारतात होणार लाईव्ह, मिळणार या जबरदस्त ऑफर्स

SCROLL FOR NEXT