Sandeep Lamichhane  twitter
Sports

युवा क्रिकेटपटूविरोधात बलात्काराची तक्रार; १७ वर्षीय मुलीने केला गंभीर आरोप

काठमांडू पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आरोपानंतर संदीप लामिछानेच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे.

Vishal Gangurde

Sandeep Lamichhane News : नेपाळ (Nepal) क्रिकेट संघाचा कर्णधार संदीप लामिछाने याच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाला आहे. काठमांडू पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या आरोपानंतर संदीप लामिछानेच्या विरोधात गुन्हा नोंद केला आहे. युवा क्रिकेटपटूविरोधातील या गंभीर आरोपामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, संदीप लामिछानेच्या विरोधात अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी गुन्हा नोंद झाल्यानंतर त्याच्या अडचणी वाढल्या आहेत. पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या वैद्यकीय तपासणीनंतर संदीप लामिछानेवर गुन्हा नोंद केला आहे. सदर घटना संदीप हा केनिया दौऱ्यावर जाण्यापूर्वी झाली आहे.

संदीप लामिछाने टी-२० क्रिकेट फॉरमॅटमधील उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे. संदीप हा टी-२० फॉरमॅटच्या नेपाळ क्रिकेट संघाचा कर्णधार आहे. तो सध्या सेंट लूसिया येथे कॅरेबियन प्रीमियर लीग खेळत आहे. नुकतंच त्याने टी-२० पाच सामन्यांची मालिका खेळली, त्यात त्याचा नेपाळ संघ ३-२ ने जिंकला. तसेच काही दिवसांपूर्वी नेपाळ एकदिवसीय नेपाळ क्रिकेट संघ ३-० ने जिंकला, मात्र त्यावेळी संदीप लामिछाने हा खेळला नव्हता. त्यावेळी संदीप हा कॅरेबियन प्रीमियर लीग खेळण्यात व्यग्र होता. लामिछाने हा विश्वात टी-२० क्रिकेटचा उत्कृष्ट युवा खेळाडू मानला जातो.

कोण आहे संदीप लामिछाने ?

संदीप लामिछाने हा आयपीएल खेळणार पहिला नेपाळी क्रिकेटपटू आहे. संदीपला २०१८ साली दिल्ली डेयरडेविल्स संघाने पहिल्यांदा लिलावात २० लाख रुपयात खरेदी केला होता. १७ वर्षीय संदीप लामिछाने हा लेग स्पिनर आहे.

संदीप हा २०१६ साली १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषक खेळाचं चांगलं प्रदर्शन केलं होतं. त्यामुळे नेपाळ संघाने आठव्या स्थानावर मजल मारली होती. संदीप हा नेपाळच्या यशस्वी गोलंदाज आहे. संदीप लामिछाने याने आतापर्यंत १३१ टी-२० सामने खेळले आहेत. त्याने १८.१८ च्या सरासरी आणि ६.८५ च्या इकॉनॉमीने १८१ विकेट घेतले आहेत. तसेच संदीप लामिछाने हा कॅरेबियन प्रीमियर लीगमध्येही चांगली गोलंदाजी करत आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Bharat Gogawale : मंत्र्याच्या मुलाच्या अडचणी वाढल्या, अटकपूर्व जामीन ३ वेळा फेटाळला, राऊत म्हणाले शिंदेसेनेचा नेता फरार

Maharashtra Live News Update: पुण्यात काँग्रेस आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना एकत्र लढण्याचा प्रस्ताव

Cold And Cough: सर्दी खोकल्यामुळे जेवणाची चव लागत नाहीये? मग हे सूप एकदा टेस्ट करून पाहाच

Sleep Problem: दिवसा झोप येतेय म्हणजे शरीर देतंय ‘SOS’ सिग्नल? कारण वाचून धक्का बसेल

Accident : दारू पिऊन ट्रॅक्टर घेऊन निघाला, निलेशचा ताबा सुटला, ४ वर्षाच्या पुतण्याचा जागीच मृत्यू

SCROLL FOR NEXT