Mohammed Shami : भारतीय क्रिकेट संघाचे माजी प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी आशिया करंडक क्रिकेट स्पर्धेसाठी मोहम्मद शमीकडे (Mohammed Shami) पूर्णपणे दुर्लक्ष केल्याबद्दल व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शास्त्री यांनी प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कर्णधार रोहित शर्मा (rohit sharma) आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांना लक्ष केलं आहे.
आशिया करंडक टी-20 क्रिकेट स्पर्धेसाठी केवळ चार वेगवान गोलंदाजांची निवड करण्याच्या भारतीय संघ व्यवस्थापनाच्या निर्णयावर शास्त्रींनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. आयपीएलमध्ये उत्तम कामगिरी करुन देखील तसेच अनुभवी मोहम्मद शमी यास संघातून बाहेर ठेवल्याचं पाहून मी अंचबित झालो अशी टिप्पणी रवी शास्त्री यांनी केले.
मंगळवारी आशिया करंडक स्पर्धेत भारतीय संघास श्रीलंकेविरुद्ध सहा गडी राखून पराभव पत्करावा लागला. भारतीय संघावर धोक्याची घंटा वाजताच शास्त्री यांनी ही टिप्पणी केली. या सामन्यातील पराभवामुळे टीम इंडियाची अंतिम फेरीत जाण्याचे मनसुबे सध्या तरी धुळीस मिळाले आहेत. या सामन्यातील कर्णधार रोहित शर्माच्या 41 चेंडूत 72 धावा व्यर्थ गेल्या. श्रीलंका संघाने 174 धावांचा पाठलाग करुन एक चेंडू राखून विजय मिळविला.
Edited By : Siddharth Latkar
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.